सोनू के टिट्टू की स्वीटी ची बॉक्सऑफीसवर दमदार कमाई

'सोनू के टिट्टू की स्वीटी' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दिवसेंदिवस बक्कळ कमाई करत आहे. नुकतेच या चित्रपटाने भारतामध्ये 41 कोटींचा पल्ला गाठला आहे.  

Updated: Mar 2, 2018, 08:03 PM IST
सोनू के टिट्टू की स्वीटी ची बॉक्सऑफीसवर दमदार कमाई  title=

मुंबई  : 'सोनू के टिट्टू की स्वीटी' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दिवसेंदिवस बक्कळ कमाई करत आहे. नुकतेच या चित्रपटाने भारतामध्ये 41 कोटींचा पल्ला गाठला आहे.  

तरण आदर्शचं ट्विट  

तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटाने शुकवारी 6.42 कोटी , शनिवारी  9.34 कोटी, रविवारी 10.81 कोटी, सोमवारी 5.17 कोटी, मंगळवारी  4.93 कोटी, बुधवारी  4.41 कोटी कमावले आहेत. त्यामुळे देशभरात या चित्रपटाने एकून 41 कोटींचा पल्ला गाठला आहे. लवकरच म्हणजे दुसर्‍या आठवड्यात हा चित्रपट 50 कोटींचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.  

 

बॉक्सऑफिसवर उत्तम कामगिरी 

यंदाच्या वर्षी पद्मावत, पॅडमॅननंतर उत्तम ओपनिंग मिळवणारा   'सोनू के टिट्टू की स्वीटी' हा तिसरा चित्रपट ठरला आहे. 

कोणताही सुपरस्टार, किंवा खास सुट्ट्यांचा प्लॅन करून या चित्रपट रिलीज न होताही बॉक्सऑफिसवर उत्तम कमाई करत असल्याने या चित्रपटाचे खास कौतुक होत आहे.