'प्रभो शिवाजी राजा'तील शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे गाणे रिलीज

'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशनपटाद्वारे महाराजांची थोरवी अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणली जात आहे. नुकतेच या सिनेमाचे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 

Updated: Dec 23, 2017, 08:22 AM IST
'प्रभो शिवाजी राजा'तील शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे गाणे रिलीज  title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचविण्याचा नवा प्रयोग समोर येणार आहे.

'प्रभो शिवाजी राजा' या अॅनिमेशनपटाद्वारे महाराजांची थोरवी अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणली जात आहे. नुकतेच या सिनेमाचे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 

गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मेफॅक निर्मित हा अॅनिमेशनपट निलेश मुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. 

शब्द-सुरांची साथ 

या सिनेमातली सर्व गाणी प्रकाश राणे यांनी लिहिली असून, भारत बलवल्ली यांचे संगीत त्याला लाभले आहे.

सचीन खेडेकर आणि सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजाचे निवेदन यात असून, शिवाजी महाराजांना अभिनेता उमेश कामत आणि धर्मेंद्र गोहिल यांनी आवाज दिला आहे. 

शिवाय शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, श्रीरंग भावे, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरत आहेत. 

महापुरूषाला मानवंदना 

प्रभो शिवाजी राजे' हा १०० मिनिटाचा अॅनिमेशनपट असून, शिवकालीन कालखंड यात दाखवला जाणार आहे.

तसेच या सिनेमाद्वारे, ३५० वर्षाहून अधिक वर्षे मोगल राजवटीत हालअपेष्टा सोसत असलेल्या आपल्या मातृभूमीसाठी 'स्वराज्य' ची आरोळी ठोकणा-या या लढवय्या महापुरुषाला अनोखी मानवंदनादेखील दिली जाणार आहे.

१२ जानेवारीला प्रदर्शित 

 दीपक विरकुड आणि विलास रानडे यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, आगामी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारील प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.