पतोडी पॅलेसमध्ये प्रवेश करताच सोहा अली खानचं बदलतं नाव, या नावाने मारली जाते हाक

सोहा अली खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Updated: Jan 9, 2022, 07:21 PM IST
 पतोडी पॅलेसमध्ये प्रवेश करताच सोहा अली खानचं बदलतं नाव, या नावाने मारली जाते हाक title=

मुंबई : सोहा अली खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याचबरोबर सोहा नवाब घराण्यातील कन्या आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. सोहा अली खानही सैफप्रमाणो तिच्या कुटुंबातील तिच्या राजघराण्याचे अनेक नियम पाळते. सैफ अली खानचं कुटुंबीय सुट्टी घालवण्यासाठी पतौडी पॅलेसला भेट देतात. प्रत्येकजण पतौडी पॅलेसचे फोटोही शेअर करत असतो. अलीकडेच एका मुलाखतीत सोहा अली खानने मुंबई आणि पतौडी पॅलेसच्या आयुष्यात किती फरक आहे हे सांगितलं.

बदलतं सोहाचं नाव
सोहा अली खानने सांगितलं की, मुंबई आणि पतौडी पॅलेसच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात. तिचं नावही वेगळे होतं. दिलेल्या एका मुलाखतीत सोहा अली खानने सांगितलं की, तिचा कूक तिला मुंबईत दुसऱ्या नावाने आणि पतौडी पॅलेसमध्ये दुसऱ्या नावाने हाक मारतो.

सोहा म्हणाली, ''जेव्हा मी पतौडीला जाते तेव्हा मी मुंबईतील आमचा कूकही माझ्यासोबत घेऊन जाते. इथे तो मला दीदी म्हणतो आणि तिथे तो मला सोहा बिया म्हणतो. तो कुणाल ईथे भैया म्हणून हाक मारतो आणि तिथे तो त्याला मिया म्हणतो, म्हणून जेव्हा तुम्ही पतौडीमध्ये पाऊल ठेवता तेव्हा काही गोष्टी बदलतात.

दोन दुनियेला करते मॅनेज 
सोहा अली खानने शेअर केलं की, तिच्या आयुष्यात दोन पूर्णपणे भिन्न जग आहेत. ती म्हणाली की, ती जगाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते, एक जग पूर्णपणे आधुनिक आहे, तर दुसरं जग जुनं आणि पारंपारिक आहे. ज्या गोष्टी मुंबईत चांगल्या दिसतात त्या पतौडी पॅलेसमध्ये नाहीत आणि पटौडीमध्ये ज्या चांगल्या दिसतात त्या मुंबईत नाहीत. वेळ आणि ठिकाणानुसार जुळवून घ्यावं लागतं.''