Neha Bhasin Video Viral: अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. अनेकजण उर्फी आम्हाला आवडत नाही बुवा, असं म्हणतात आणि तिनं नेमका काय अतरंगीपणा केला आहे हे वारंवार पाहतातही. अनेकांच्या मते तर, उर्फीसारखं दुसरं कुणीच नाही. पण, त्यांच्या या विचाराचा शह मिळाला आहे. कारण उर्फीच्याही (Urfi Javed video) पुढे कुणीतरी पोहोचलंय ज्याची एकच चर्चा सध्या पाहायला मिळते.
उर्फीला टक्कर देणारी ही सोशल मीडिया स्टार आहे, नेहा भसिन (Neha Bhasin). नेहा सोशल मीडिया युजर्ससाठी नवी नाही. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बोल्ड फोटो शेअर करण्यातही ती मागे नाही बरं. अशा या नेहानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती सिझलिंग हॉट लूकमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहताच तिला उर्फी (Urfi Javed) 2.0 असं नाव दिलं आहे. (Singer Neha Bhasin shares bold Video netizens compare her with urfi javed )
सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, सध्या भारतीय वर्तुळात मात्र नेहाच्याच व्हिडीओची हवा आहे. निमित्त काय? निमित्त नेहमीचंच. बोल्ड लूक आणि मादक अदा. काळ्या रंगाच्या एका आऊटफिटमध्ये नेहा यात शॉर्ट हेअर लूकमध्ये (Short Hair look) दिसत आहे. काळा आणि सोनेरी या दोन रंगांचा वापर करत नेहानं हा लूक तयार केला आहे. पॉपी शेडच्या नेलपेंटनं हा लूक आणखी उठावदार आणि नजर रोखणारा ठरत आहे.
Instagram वर व्हिडीओ शेअर करताना तिनं बेयॉन्सेची एक ओळ कॅप्शनमध्ये लिहिली आहे. I am too classy for this world असं ती या व्हिडीओच्या माध्यमातून म्हणताना दिसत आहे. गायिका म्हणून ओळख असणाऱ्या नेहाच्या या व्हिडीओला 35 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. काहींना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे, काहींना तिनं लूक ज्या पद्धतीनं कॅरी केला आहे तो अंदाज भावला आहे. काही नेटकऱ्यांनी मात्र हे काय नको ते असं म्हणत तिची खिल्लीही उडवली आहे. तुम्हाला कसा वाटला नेहाचा हा व्हिडीओ?