इयत्ता 6 वी पासून केकेच्या लव्हस्टोरीची सुरुवात; संगीतच नाही, तर पत्नीसोबतही एकनिष्ठ

प्रेम असावं तर असं... केके शेवटच्या क्षणापर्यंत होते संगीत आणि पत्नीसोबत एकनिष्ठ  

Updated: Jun 1, 2022, 09:47 AM IST
इयत्ता 6 वी पासून केकेच्या लव्हस्टोरीची सुरुवात; संगीतच नाही, तर पत्नीसोबतही एकनिष्ठ title=

मुंबई : आजच्या जीवनाच प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आज प्रेम केलं तर पुढच्या काही दिवसात ब्रेकअप. पण काही नाती अशी असतात जी प्रेमासाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यापैकी एक गायक केके यांचं पत्नीसोबत असलेलं नातं. आज केके आपल्यात नसला, तरी त्याने आपल्या गाण्यांमधून अनेकांनी दिलेली प्रेरणा आणि त्याचं पत्नीवर असलेलं प्रेम कधीचं संपणार नाही. शालेय जीवनापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केके संगीत आणि पत्नीसोबत एकनिष्ठ राहिला. 

विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये केकेने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. केके आणि ज्योती यांची भेट 6 इयत्तेत असताना झाली. तेव्हा केके आणि ज्योती आतापर्यंत एकत्र होते. 

केके म्हणाला होता, 'मी एकाचं मुलीला डेट केलं आहे आणि ती मुलगी आहे माझी पत्नी ज्योती. मी फार लाजाळू होतो, त्यामुळे मी तिला हवं तसं डेट देखील करू शकलो नाही. माझी मुलं देखील मला या गोष्टीमुळे चिडवायचे...' 

लग्नासाठी केकेने केलं असं काम? 
केके आणि ज्योतीने 1991 साली लग्न केलं. पण लग्नाआधी केकेला स्वतःसाठी नोकरी शोधावी लागली. त्यावेळी काहीच न मिळाल्याने त्यांनी सेल्समनची नोकरी पत्करली. त्यानंतर केकेचं लग्न झालं. मात्र सहा महिन्यांतच तो नोकरीमुळे वैतागला, कारण त्याच्या नशीबात काही वेगळचं लिहिलं होतं. 

अखेर पत्नी आणि वडिलांच्या पाठिंब्यामुळे सेल्समनची नोकरी सोडली आणि ज्या मार्गावर त्यांची वाटचाल लिहिली होती, त्या मार्गाचा अवलंब केला. केकेसाठी तो मार्ग होता संगीताचा. पण आज केकेचा