KK : सर्वात महागड्या गायकांपैकी एक, किती संपत्ती मागे सोडून गेले केके?

जाणून घ्या पत्नी आणि मुलांसाठी किती संपत्ती मागे सोडून गेले गायक केके  

Updated: Jun 1, 2022, 09:33 PM IST
KK : सर्वात महागड्या गायकांपैकी एक, किती संपत्ती मागे सोडून गेले केके? title=

KK Death News : बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक केके (KK) यांचं 31 मे रोजी निधन झालं. केके हे म्यूझिक इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक होते. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी एका कॉन्सर्टमध्ये गेले असताना केके यांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती खालावली आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

गायक केके यांचा जीवन प्रवास खूप यशस्वी होता. केकेने अनेक चित्रपटांमध्ये हिट गाणी दिली. त्यांच्या गाण्यांवर लोकांनी भरभरुन प्रेम केलं. केके यांना गायनविश्वातील  बेताज बादशहा म्हटलं जायचं. जाणून घेऊया त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल.

गायक केके यांचा कार संग्रह
केके यांचा जन्म दिल्लीतील मातायाली कुटुंबात झाला. केके या नावाने त्यांना स्टेज आणि प्ले बॅक सिंगर म्हणून ओळख मिळाली. दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नंतर ते गायन क्षेत्रात आले. त्याच्याकडे करोडोंच्या महागड्या गाड्या होत्या. केके यांच्या कार कलेक्शनमध्ये ऑडीसह अनेक मोठ्या गाड्या होत्या.

केके यांचं अलिशान घर
केके यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्याच्या आवाजाच्या जोरावर केके लक्झरी लाईफस्टाईल जगत होते. केके हे मुळचे दिल्लीचे रहिवासी होते. पण त्यांचं मुंबईत एक आलिशान घर आहे, या घरात ते पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. 

केके यांची कमाई
केके हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या गायकांपैकी एक होते. एका गाण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये घेत असे. शिवाय स्टेज शोमधून त्यांना मोठी रक्कम मिळत होती.  लाइव्ह कॉन्सर्टसाठी केके 10 ते 15 लाख रुपये घेत असत.

गायक केके यांची एकूण संपत्ती
केके यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके करोडो रुपयांची संपत्ती आपल्या पत्नी आणि मुलांसाठी सोडून गेलेत. केकेची एकूण संपत्ती $1.5 दशलक्ष पर्यंत असल्याचं सांगितले जातं. भारतीय रुपयांमध्ये 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.