‘सिंबा’ आणि ‘सिंघम’चं मिलन, रणवीरच्या सिनेमात अजयची खास भूमिका

अजय देवगन आणि रोहित शेट्टी या जोडीने अनेक सिनेमात एकत्र धमाका उडवलाय. आता रोहित शेट्टी रणवीर सिंहसोबत अ‍ॅक्शन मसाला सिनेमा ‘सिंबा’ घेऊन येत आहे. आता या सिनेमात रोहितचा लकी चार्म अजय देवगनही दिसणार आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 6, 2018, 03:35 PM IST
‘सिंबा’ आणि ‘सिंघम’चं मिलन, रणवीरच्या सिनेमात अजयची खास भूमिका  title=

नवी दिल्‍ली : अजय देवगन आणि रोहित शेट्टी या जोडीने अनेक सिनेमात एकत्र धमाका उडवलाय. आता रोहित शेट्टी रणवीर सिंहसोबत अ‍ॅक्शन मसाला सिनेमा ‘सिंबा’ घेऊन येत आहे. आता या सिनेमात रोहितचा लकी चार्म अजय देवगनही दिसणार आहे. 

अजय देवगन स्पेशल भूमिकेत

रोहित शेट्टीने आत्तापर्यंत १३ सिनेमे दिग्दर्शित केले आहे आणि यातील १० सिनेमे त्याने अजय देवगनसोबत केले आहेत. आता आपल्या ‘सिंबा’ सिनेमात रोहित अजयची झलक दाखवणार आहे. अजय देवगन या सिनेमात एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे. 

 

Shetty and Singh on the sets of Chings ;)

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

अजय दिसणार या भूमिकेत

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगन एका विशेष भूमिकेत या सिनेमात दिसेल. अजयने या सिनेमात एक खास भूमिका करावी, असे रोहितला वाटत होते. त्यामुळे त्याने थेट अजयला विचारले. अजयनेही होकार दिल्याचे समजते. अजय देवगन रणवीर सिंह स्टारर ‘सिंबा’मध्ये क्लायमॅक्समध्ये दिसण्याची शक्यता. 

संग्राम भालेरावच्या भूमिकेत रणवीर

‘सिंबा’ मध्ये रणवीर सिंह पोलीस अधिकारी संग्राम भालेरावच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सिंबा' तेलगु सिनेमा ‘टेंपर’चा रिमेक आहे.