मृत्यूच्या केवळ 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थ शुक्ला याने केले उदात्त काम, म्हणाला होता, आयुष्य खूप स्वस्त झाले आहे!

Sidharth Shukla Death: 'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे अचानक निधन झाले. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ याने जगाचा निरोप घेतला आहे.  

Updated: Sep 2, 2021, 02:25 PM IST
मृत्यूच्या केवळ 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थ शुक्ला याने केले उदात्त काम, म्हणाला होता, आयुष्य खूप स्वस्त झाले आहे! title=

मुंबई : Sidharth Shukla Death: 'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे अचानक निधन झाले. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ याने जगाचा निरोप घेतला आहे. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याने कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप चाहते जमवले होते. या दिवसांत तो त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता. त्यांने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. टीव्ही सीरियल 'बालिका वधू'मधून सिद्धार्थ शुक्ला रातोरात घराघरात पोहोचला होता. तो आता नसला तरी त्याने केलेले काम लक्षात राहिले आहे. सिद्धार्थ शुक्ला याने मृत्यूच्या 6 दिवस आधी मानवाच्या जीवनाबद्दल भाष्य केले होते. आयुष्य खूप स्वस्त झाले आहे! ( shukla says human life is so cheap)

उदात्त कार्य करत चाहत्यांना दिला संदेश 

सिद्धार्थ शुक्ला याने (Sidharth Shukla) मृत्यूपूर्वी केवळ 6 दिवस आधी एक उदात्त कार्य केले. सिद्धार्थ शुक्ला यांने 27 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीला सांगितले होते की, सिद्धार्थ भटक्या कुत्र्यांसाठी मोहीम राबवत आहे आणि तो प्राण्यांच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था करतो. त्या व्यक्तीने अभिनेत्याचे आभार मानले. सिद्धार्थाचे या व्यक्तीने आभारही मानले होते. त्यानंतर सिद्धार्थाने प्रतिसाद देत म्हटले होते, 'असे एक जग आहे तिथे मानवी जीवन इतके स्वस्त झाले आहे ... ते पाहणे आनंददायी आहे. भटक्या कुत्र्यांबद्दल दया करा.

सिद्धार्थ ट्विटरवर होता सक्रिय 

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) ट्विटरवर खूप सक्रिय होता आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना उत्तरही देत ​​असे. सिद्धार्थ शुक्ला याने याआधीही एका चाहत्याला विनंती केली होती. जगात प्रेम निर्माण होण्यासाठी काहीतरी कर. तो नेहमी आपल्या प्रियजनांना योग्य मार्ग दाखवायचा. सिद्धार्थ शुक्ला याची ही शैली चाहत्यांना खूप भावली आणि लोक त्याच्यासाठी दिवाने होत होते. तो कुठेतरी दिसला, तर त्याच्या चाहत्यांचा त्याला गराडा पडत असे. तो आपल्या चाहत्यांना कधीही दुखवत नसे.