SidNaz : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची पहिली ओळख बिग बॉसमध्ये 

Updated: Sep 2, 2021, 03:18 PM IST
SidNaz : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची पहिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं होतं. सिद्धार्थच्या अगदी जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री शहनाज गिल हिला सिद्धार्थच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. शहनाज गिल आपल्या शुटिंगकरता बाहेर होती. ती तात्काळ मुंबईला रवाना झाली आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल हे बिग बॉसच्या घरी भेटले. या दोघांची जोडी प्रेक्षकांनी देखील खूप पसंत केली. हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे. (Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, या लोकांचे मानले आभार

शहनाजने थांबवली शुटिंग 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज गिलने आपलं शुटिंग थांबवलं आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. शहनाज गिल पूर्णपणे कोलमडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शहनाज मोठ्या धक्क्यात आहे. तिला सिड या जगात नाही ही गोष्ट मान्य करायला मान्य नाही.(धक्कादायक... अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन) 

बुधवारी रात्री 9.30 वाजता सिद्धार्थ शुक्ला बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याला जवळच्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सिद्धार्थ शुक्लाची बहिण आणि त्याचे भावोजी रूग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी अभिनेत्याच्या निधनाची माहिती आज सकाळी मिळाली. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.  (Sidharth Shukla Death : झोपण्यापूर्वी घेतली होती काही औषध, नंतर उठलाच नाही)

सिद्धार्थ शुक्लाचे पोस्टमार्टम दुपारी 12.30 नंतर केले जाणार आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना माहिती दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. पोलीस या प्रकरणाबाबत कोणतीच माहिती घाईत देत नाही. पोलिसांना ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे ते मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.