सिद्धार्थ मल्होत्रासोबत अखेर दिसली 'ती'; Fans म्हणतात 'जोडी कमाल है'

एका व्हिडिओने वेधलं सर्वांचं लक्ष... 

Updated: Oct 13, 2021, 11:30 AM IST
सिद्धार्थ मल्होत्रासोबत अखेर दिसली 'ती'; Fans म्हणतात 'जोडी कमाल है' title=

मुंबई : 'शेरशाह' चित्रपटानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर त्याच्या लोकप्रियतेत देखील वाढ झाली आहे. 'शेरशाह' चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे.  'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीने मुख्य भूमिका साकारली. चित्रपटात कियारा, कॅप्टन विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेन्ड डिंपल चीना यांच्या भूमिकेत दिसली. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ एका छोट्या फॅनसोबत दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये सिद्धार्थ त्याच्या छोट्या फॅनसह 'शेरशाह' चित्रपटातील काही डायलॉग बोलताना दिसत आहे. ती चिमुकली कियाराच्या डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमधील दोघांची केमिस्ट्री नेटकऱ्यांना फार आवडली आहे. सिद्धार्थच्या छोट्या फॅनचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'जोडी कमाल है'....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सिद्धार्थ आणि त्याच्या छोट्या फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  सिद्धार्थचं प्रोफेशनल आयुष्य तर यशाच्या उच्च शिखरावर आहे. तर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर सिद्धार्थ सध्या कियाराला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे.