विकी- कतरिना पाठोपाठ बॉलिवूडचं आणखी एक लोकप्रिय कपल अडकणार लग्नबंधनात?

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. 

Updated: Dec 22, 2021, 06:36 PM IST
 विकी- कतरिना पाठोपाठ बॉलिवूडचं आणखी एक लोकप्रिय कपल अडकणार लग्नबंधनात? title=

मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोन्ही स्टार्स पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

विक्की-कतरिनासारखं करणार लग्न?
सूत्रानुसार, 'कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचं नातं सुरुवातीच्या टप्प्यात आहे. दोघंही लवकरच लग्न करणार आहेत असं म्हणता येत नाही. मात्र कतरिना कैफ आणि विकी कौशलने चाहत्यांना जसं आश्चर्यचकित केलं हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे. कदाचित कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही पुढच्या वर्षी लग्न करुन चाहत्यांना सरप्राईज देतील. सिद्धार्थ आणि कियारा पुढील वर्षी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करू शकतात.दोघेही इंडस्ट्रीतील तरुण कलाकार आहेत 

या चित्रपटात दिसणारी जोडी
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सिद्धार्थ आणि कियारा 'शेरशाह' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात शेरशाहने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. त्याचवेळी कियाराने त्याची गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला IMDb वर सर्वोच्च रेटिंग देखील मिळाली आहे.