'श्वेता मला नोकराप्रमाणे वागणूक देत आहे'

अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर गंभीर आरोप केले आहेत. 

Updated: Jul 1, 2020, 11:58 AM IST
'श्वेता मला नोकराप्रमाणे वागणूक देत आहे' title=

मुंबई : टेलिव्हिजन जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या खासगी आयुष्यात काही महिन्यांपूर्वी आलेले वादळ अद्यापही शमलेलं नाही. ज्यामुळं तिच्या वैवाहिक नात्याला तडा गेला. एकीकडे अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेताच्या संपर्कात असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे श्वेता सांगत आहे की, ती अभिनवपासून दूर तिच्या मुलांसोबत राहत आहे. 

अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता खोट बोलत असल्याचे आरोप करत आहे. याच दरम्यान अभिनव कोहलीने आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला आहे. बॉलिवूड लाइफने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, श्वेता तिच्या पतीला चांगली वागणूक देत नसल्याचा खुलासा खुद्द अभिनवने केला आहे. 

'श्वेता मला माझ्या मुलांना भेटू देत नाही. शिवाय ती मला एखाद्या नोकरासारखी वागणूक देते.' असा खुलासा करत अभिनव कोहलीने श्वेता विरोधात आरोप केले आहेत. मे २०२० पर्यंत श्वेता आणि अभिनव एकमेकांच्या संपर्कात होते. 

'मी पलकची प्रत्येक गरज पूर्ण केली आहे आणि आता श्वेता मला माझ्या मुलाला रियानशला भेटू देत नाही.' असं देखीव तो म्हणला. त्यामुळे तो आता न्याय मिळवण्यासाठी मानवाधिकार संस्था किंवा कोणतीही स्वयंसेवी संस्थेकडे मदतीची मागणी करत आहे.