44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण

Shweta Tiwari Total Net worth : 810000000 ची एकूण संपत्ती, मुलांसोबत कोटींच्या घरात राहते श्वेता तिवारी!

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2024, 01:56 PM IST
44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण title=
(Photo Credit : Social Media)

Shweta Tiwari Total Net worth : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीनं स्वत: ला इतकं मेनटेन ठेवलंय की तिला पाहून तरुणींना लाज वाटते. श्वेता तिवारी तिच्या लूक्स आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे श्वेता तिवारीला आणि तिच्या लेकीला अर्थात पलक तिवारीला एकत्र पाहिलं तर लोकं त्यांना बहिणी बोलतात. आज 4 ऑक्टोबर रोजी त्याच श्वेताचा 44 वा वाढदिवस आहे. श्वेतानं एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिनं 'प्रेरणा शर्मा' ही भूमिका साकारली होती. तेव्हा पासून आतापर्यंत तिच्या चाहत्यांच्या यादीत लोकांची संख्या ही वाढू लागली आहे. तिनं फक्त मालिकाच नाही तर त्यासोबत भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. इतक्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्वेताविषयी अनेक गोष्टी जाणून घेऊया... 

श्वेता तिवारी ही तिच्या सोशल मीडियावरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यातून श्वेता तिचं फिटनेस सीक्रेट देखील चाहत्यांसोबत शेअर करते. तिचा फिटनेस पाहून सगळ्यांनाच तिच्यासारखं आपण ही दिसावं यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि ते देखील स्वत: च्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

श्वेता तिवारीनं आजवर अनेक शोजमध्ये काम केलं आहे. चित्रपटात काम करण्यापासून मालिका आणि वेब सीरिजमध्ये देखील श्वेता काम करते. ती अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी जवळपास सगळ्या प्रकारचे काम केले आहे. अनेक कलाकारांनुसार, श्वेता मालिकेच्या एक एपिसोडसाठी जवळपास 3 लाख रुपये मानधन घेते. मालिकांमध्ये काम करण्याशिवाय श्वेता तिवारी वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटांचं मानधन आणि वेब सीरिजच्या मानधनाविषयी कधी कळत नाही, पण रिपोर्ट्सनुसार, श्वेता दरमहिन्याला जवळपास 60 लाख रुपये कमावते. 

कार कनेक्शन

श्वेता तिवारीला गाड्यांची आवड आहे आणि तिच्या गॅरेजमध्ये तीन लग्झरीयस गाड्या आहेत. या लिस्टमध्ये सगळ्यात आधी ऑडी ए4 आहे. या गाडीची किंमत 47 ते 48 लाख आहे. त्याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज 730 डी ही कार देखील आहे. या कारची किंमत 1.38 कोटी आहे. ही श्वेताच्या कार कलेक्शनमधील सगळ्यात महागडी कार आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी Hyundai Santro आहे. ही श्वेताची सगळ्यात जूनी कार आहे. 

हेही वाचा : अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! करण जोहरनं खुलासा करताच कतरिनाला धक्का; अनुष्का म्हणाली, 'पागल'

श्वेता मुंबईच्या कांदिवली परिसरात आहे. श्वेताच्या लग्झरीयस घराचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. अर्थात ती तिच्या मुलांसोबतचे घरातील अनेक फोटो शेअर करताना दिसते. तिचं घर हे कलरफूल आहे. त्यात लॅम्प, इनडोर झाडं, लाकडी फर्निचर आणि सजावटीच्या गोष्टी आहेत. त्याशिवाय तिनं तिच्या गॅलरीला खूप सुंदर पद्धतीनं सजवलं आहे. तिच्या या घराची किंमत ही कोटींच्या घरात आहे. रिपोर्ट्सनुसार, श्वेताची एकूण संपत्ती ही 81 कोटी आहे.