मुंबई : ऐश्वर्या राय ज्याप्रकारे चाहत्यांना आवडते, तशीच ती तिच्या कुटुंबाचीही लाडकी आहे यात काहीच शंका नाही. ऐश्वर्या एक परिपूर्ण सून आणि आई आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पण ऐश्वर्याचं तिच्या नणंदसोबत कसं बॉन्डिंग आहे हे तुम्हाला माहीत आहे का? याचा खुलासा खुद्द श्वेता बच्चनने केला होता.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कॉफी विथ करणच्या त्या भागाचा आहे जेव्हा श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन शोमध्ये पोहोचले होते. करण जोहर आणि श्वेता बच्चन यांच्यात रॅपिड फायर राऊंड सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान श्वेताला ऐश्वर्याबद्दल विचारण्यात आलं. त्यानंतर तिने तिच्या सवयींबद्दल सांगितलं ज्या तिला अजिबात आवडत नाहीत. श्वेता म्हणाली की, मला तिची एक सवय अजिबात आवडत नाही. ती म्हणजे ऐश्वर्या कधीही कॉल आणि मेसेजला उत्तर देत नाही. तसंच तिचं टाईम मॅनेजमेंटही खराब आहे.
याशिवाय श्वेता बच्चनने ऐश्वर्याच्या कौतुकात काही शब्द बोलले आहेत. अभिनेत्रीबद्दल तिने सांगितलं की, एक स्ट्राँग हिला असण्यासोबतच ती एक चांगली आई, सून आणि वहिनी आहे. शो दरम्यान, तक्रारी आणि कौतुकाची ही मालिका विनोदी पद्धतीने झाली. मात्र चाहत्यांना ऐश्वर्या रायबद्दलच्या या सवयी जाणून घेण्यास खूप मजा येत आहे.
ऐश्वर्या बच्चनने कुटुंबातील सर्वांची मने जिंकली आहेत. सासरे अमिताभ यांच्याशी तिची चांगली बॉन्डिंग आहे. ते तिला त्यांची मुलगी श्वेता सारखी वागणूक देतात. फक्त अमिताभच नाही तर ऐश्वर्याची सासू जया देखील एकदा म्हणाल्या होत्या की, ती खूप गोड आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती एक मोठी स्टार आहे आणि तरीदेखील ती कुटुंबात खूप मॅनेज झाली आहे.