नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Updated: Jan 18, 2023, 08:14 PM IST
नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....? title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) बॅट न्यूझीलंडविरूद्ध (Ind Vs NZ) चांगलीच तळपली आहे. शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने (Team India Win) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत.. 

पण तुम्हाला माहीत आहे का की, क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरचे दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे. बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. या दोन सुंदरींपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान आणि दुसरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर.

सारा तेंडुलकरसोबतही नाव जोडले गेलं
शुभमन गिलचे सारा अली खानसोबत अफेअर असल्याच्या बातम्या येत असतानाच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र, सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या अफेअरबाबत काहीही कंन्फर्मेशन दिलेलं नाही. ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक आणि शुभमन गिलने लग्न केलं अशी चर्चा रंगली होती. कारण गुगलवर सारा तेंडूलकर नाव सर्च केल्यावर तिच्या माहितीत ती शुभमन गिलची बायको असल्याचं दिसत होतं. म्हणून या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. 

सारा अली खानसोबतच्या अफेअरवर त्याने ही गोष्ट सांगितली
23 वर्षीय शुभमन गिल सारा अली खानसोबत अनेकदा स्पॉट झाला आहे. यानंतर अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला. पण एका टॉक शोमध्ये साराच्या आणि त्याच्या लिंकअपच्या बातम्यांवर शुभमन असं काहीतरी बोलून गेला ज्यानंतर या अफवांनी खूप जोर धरला. टॉक शोमध्ये जेव्हा शुभमन गिलला विचारण्यात आलं की, तो सारा अली खानला डेट करतोय की नाही? प्रत्युत्तरात क्रिकेटर म्हणाला- कदाचित...

सारासोबतचे फोटो व्हायरल झाले होते
शुभमनच्या वक्तव्यादरम्यान, सारा अली खानसोबतचे क्रिकेटरचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये कधी हे दोन स्टार्स दुबई 2022 मध्ये एकत्र डिनर करताना दिसले तर कधी जयपूर एअरपोर्टवर दोघे एकत्र दिसले.