'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'गे' लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा 

Updated: Feb 28, 2020, 01:44 PM IST
'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन  title=

मुंबई : Shubh Mangal Zyada Saavdhan Box Office Collection Day 7 आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) चा सिनेमा शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. पण या सिनेमाला आयुष्मानच्या इतर सिनेमांप्रमाणे यश मिळालेलं नाही. काही दिवसांपूर्वी या सिनेमाने 2.5 ते 3 करोड रुपयांच कलेक्शन केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Train waala pyaar.  Is pyaar ke liye ab hindustan ko train karenge. jeetega pyaar seh parivaar. This Friday. 21st Feb.

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

अशातच सिनेमाने एका आठवड्यात 45 करोड रुपयांची कमाई केली आहे. याची अधिकृत घोषणा मात्र अद्याप बाकी आहे. या सिनेमाने दिल्लीत चांगल प्रदर्शन केलेलं नाही. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झालं आहे. या सिनेमाच्या अगोदर आयुष्मानचे 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.  

या सिनेमाने पहिल्या दिवशी 9.55 करोड रुपये, दुसऱ्या दिवशी 11.08 रुपये, तिसऱ्या दिवसी 12.03 करोड, चौथ्या दिवशी 3.87 करोड रुपये, पाचव्या दिवशी 3.07 करोड रुपये आणि सहाव्या दिवशी 2.62 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

या सिनेमाला आता तापसी पन्नूच्या 'थप्पड' सिनेमाची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. तापसी पन्नूचा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.