'या' कामात Shraddha Kapoor नं दीपिका-आलिया देखील टाकलं मागे

असं कोणतं काम ज्यामध्ये Shraddha Kapoor नं चक्क दीपिका आणि आलियाला मागे टाकलं; खास फोटो शेअर करत खुद्द अभिनेत्रीने दिली मोठी माहिती...   

Updated: Nov 9, 2022, 12:50 PM IST
'या' कामात Shraddha Kapoor नं दीपिका-आलिया देखील टाकलं मागे  title=

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक सिनेमांतून चाहत्यांच्या मनात राज्य करणारी श्रद्धा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. करियरच्या सुरुवातीला अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्रीला लोकप्रियता 'आशिकी 2' सिनेमातून मिळाली. आता अभिनेत्रीने पुन्हा नवा इतिहास रचला आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड आनंदी आहे. (shraddha kapoor instagram)

श्रद्धाचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स 
इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स अभिनेत्री प्रियांका चोप्राचे आहे. प्रियांकानंतर आता श्रद्धा दुसऱ्या स्थानावर आहे. प्रियांका आणि श्रद्धाने या शर्यतीत अनेक मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि कतरिना कैफला देखील श्रद्धाने मागे टाकलं आहे. 

दरम्यान, श्रद्धाने हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. श्रद्धाने खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'चहासोबत 75 मिलियन फॉलोअर्सचा आनंद... मोठी-मोठी इन्स्टा फेम आणि छोटा-छोटा आनंद...' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत  आहे.  (shraddha kapoor songs)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रींचे फॉलोअर्स 
प्रियांका चोप्रा ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी भारतीय अभिनेत्री आहे आणि तिचे 83.2 दशलक्षाहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.  तर दुसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. इन्स्टाग्राम श्रद्धाचे 75.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.  (shraddha kapoor upcoming movies)

प्रियांका आणि श्रद्धानंतर गायिका नेहा कक्कर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे सध्या इंस्टाग्रामवर 72.4  मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दीपिका पदुकोणचे 69.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. कतरिना कैफचे 68.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (shraddha kapoor boyfriend)