Tunisha Sharma Case: 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) जगाचा निरोप घेतला. तिच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनामुळे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. या प्रकरणाला वेगळं वळण मिळत असल्याचे सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेतील तुनिषा शर्माच्या सहकलाकारांना बोलावून पोलीस त्यांचे जवाब नोदंवत आहेत.
अली बाबा या मालिकेतील सहकलाकार अभिनेता पार्थ जुत्शीला (Parth Zutshi) पोलिसांनी चौकशीसाठी वालीव पोलिस ठाण्यात बोलावले. पोलीसांनी त्याला काही प्रश्न विचारुन या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः शोमध्ये होतो आणि तुनिषाने कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतले नव्हते. ती थोडी काळजीत होती. असं तुनिषाचा सहकलाकार पार्थ जुत्शीने पोलीसांनी सांगितले. “पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले आणि सामान्य प्रश्न विचारले. मी त्यांच्या संबंधांवर भाष्य करू शकत नाही. मला काही कल्पना नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला कळले की तुनिषाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांने पोलीसांना सांगितले. असं पार्थनं माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
TV actor Tunisha Sharma death case | Mumbai:I was called for questioning by police & was asked general questions. I can't comment on her relations,I don't have any idea, it was her internal matter.When incident happened, I came to know she attempted suicide:Parth Zutshi, Co-actor pic.twitter.com/BRb2N53H54
— ANI (@ANI) December 25, 2022
आलेल्या माहितीनुसार तुनिषा शर्मा आणि तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान (Sheezan Mohammed Khan) हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांचे ब्रेकअप झाले. पण तुनिषाने शीझानच्या मेकअप रुममध्ये गळफास लावून जीवन संपवल्याने अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या. तुनिषाच्या आईने (Tunisha Sharma Mother) वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्ररीवरुन शीझानला ताब्यात घेतलं आहे. तुनिषाच्या मृतदेहावर रविवारी 25 डिसेंबर रोजी पोस्टमार्टम होणार आहे.
तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यामुळे नवनवीन अॅंगल समोर येत आहेत. अद्याप आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही पण लवकरच पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील. तेव्हा नेमकं कारण बाहेर पडेल अशीच सगळे अपेक्षा करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.