धक्कदायक : 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं...' भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचा मोठा खुलासा

 लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अचानक एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.  मात्र त्याच्या निधनावर त्यांचे भाऊ खक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केलं आहे. 

Updated: Mar 10, 2024, 12:57 PM IST
धक्कदायक : 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं...' भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचा मोठा खुलासा title=

मुंबई : दिवगंत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे हा त्याच्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगसाठी ओळखला जायचा. जरी लक्ष्मीकांत आज आपल्यात नसले तरी असा कोणी नसेल ज्याला हा अभिनेता माहिती नसेल. लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत आजही या अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अचानक एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.  मात्र त्याच्या निधनावर त्यांचे भाऊ खक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केलं आहे. नुकताच पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या भाष्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांचे निधन झालं.

पुरुषोत्तम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, 'लक्ष्याने स्वत:ला संपवलं. ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने ते केले नाही. शरीर हे तुमचे फार महत्त्वाचं माध्यम असते, जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार. त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल, तेव्हा तुमचं सगळे संपते, हेच नेमके लक्ष्याच्या बाबतीत झाले.' पुढे ते म्हणाले, 'लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही. मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही, तू ह्या गोष्टींपासून लांब रहा. जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरु झाले. पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्मची गरज होती. लक्ष्याने कायम त्याला जे हवे तेच केले. त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं. 

त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही. जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर हेच त्यानं संपवलं आणि स्वत:लाही. पण याची जाणीव त्याला अगदी शेवटाला झाली. तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं. सर आली धावून हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक.'

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनायच्या प्रवासाला सुरुवात करताच मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या कॉमेडीने त्यांच्या चाहत्यांना खळखळून हसवलं. आजंही त्यांचे सिनेमा त्याच एनर्जीने घरा-घरात पाहिले जातात.