अभिनेत्रीचा तरुणाला अडवून अश्लील डान्स, 'हेच पुरुषाने केले असते तर..?' नेटकऱ्यांचा संताप

Sherlyn Chopra Viral Video: अभिनेत्रीनं सार्वजनिक ठिकाणी केलेल्या या कृत्यानं नेटकऱ्यांना चांगलाच संताप आला आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला सुनावलं असून हेच जर एका पुरुषानं केलं असतं तर काय झालं असतं त्याला कशा गोष्टींचा सामना करावा लागला असता याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 17, 2023, 01:24 PM IST
अभिनेत्रीचा तरुणाला अडवून अश्लील डान्स, 'हेच पुरुषाने केले असते तर..?' नेटकऱ्यांचा संताप title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Sherlyn Chopra Sexy Dance Viral Video: मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही सध्या 'पौरषपुर 2' या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तर शर्लिन सोशल मीडियावर तिच्या या वेब सीरिजविषयी पोस्ट शेअर करताना दिसते. शर्लिन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शर्लिन चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच शर्लिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्लिननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

शर्लिनचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूड आणि विरल भयानीनं शेअर केले आहेत. शर्लिन या व्हिडीओत एका मुलाला अडवून ती सार्वजनिक ठिकाणी अश्लील डान्स करताना दिसते.  या व्हिडीओत शर्लिन बोल्ड अंदाजात दिसत आहे. तर शर्लिननं काळ्या रंगाची स्पोट्स ब्रा आणि टाईट्स परिधना केली आहे. त्यासोबत शर्लिननं मॅचिंग बुट्सही परिधान केले आहेत. शर्लिनचा बोल्ड लूक या व्हिडीओत दिसत आहे. त्यात तिनं सार्वजनिक ठिकाणी एका मुलाला अडवून केलेल्या या अश्लील डान्समुळे सगळ्यांना आश्चर्च झाले आहे. शर्लिननं या व्हिडीओत त्या मुलाला कधी इथे तर कधी तिथे हात लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ती त्या मुलाला पकडून त्याच्यासोबत डान्स करू लागली. तर त्या मुलाला याची लाज वाटू लागली होती. त्यानंतर तो मुलगा लाजून तिथून निघून जाते. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंटही केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शर्लिनचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करत म्हणाले, "हेच जर एका मुलानं केलं असतं तर महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संस्था समोर आल्या असत्या. हे खूप चुकीचं आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "हा तर अत्याचार आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "उर्फी हिच्या पेक्षा चांगली आहे ती तरी लोकांच्या जवळ जात नाही." आणखी एक नेटकरी म्हणाला, "जर असंच तिच्यासोबत एका मुलानं केलं असतं तर म्हणाली असती की त्या मुलानं मीडियासमोर माझ्यावर अत्याचार केला आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "तिच्या या अश्लीलपणाची त्याला किती लाज वाटते हे सगळ्यांना दिसतंय." तिसरा नेटकरी म्हणाला, "हेच जर त्या मुलानं केलं असतं तर त्याला अटक करण्यात आली असती." 

हेही वाचा : बाळाचा बाप कोण? Ileana D'Cruz ने अखेर केला खुलासा, शेअर केला फोटो

शर्लिनविषयी बोलायचं झालं तर तिनं 'टाइमपास' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शर्लिननं त्यानंतर कामसूत्र चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर त्याशिवाय तिनं प्लेबॉय या मॅग्झीनसाठी बोल्ड फोटोशूट देखील केले होते. शर्लिन जेव्हा बिग बॉसमध्ये होती तेव्हा ती चर्चेत आली होती. त्याचं कारण म्हणजे तिनं बाथरुममध्ये देखील कॅमेरा लावा अशी मागणी केली होती.