Shefali Jariwala on Not Being Mother After 10 Years Of Marriage : वयाच्या 19 व्या वर्षी 'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळख मिळवणारी शेफाली जरीवाला आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शेफालीनं 2002 मध्ये 'कांटा लगा' हा म्युजिकनं सगळीकडे चर्चेचा विषय ठरली होती. त्या एक म्युजिक व्हिडीओमुळे तिला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर शेफालीनं सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या चित्रपटात तिनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण आता शेफाली चर्चेत असण्याचं कारण तिचं आई विषयी असलेलं वक्तव्य आहे.
नुकतीच शेफालीनं पारस छाबडाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिला विचारण्यात आले होते की तिनं कधी बेबी प्लॅनिंग विषयी विचार केला नाही? त्यावर उत्तर देत शेफालीनं सांगितलं की 'आम्ही मुलं कधीही जन्माला घालू शकतो, पण मला वाटत की जगात अनेक मुलं आहेत ज्यांना एका घराची गरज आहे. प्रेमाची गरज आहे. आपल्या मुलांना तर सगळेच प्रेम करतात, पण ती व्यक्ती मोठी असते जी दुसऱ्या कोणाचा बाळाला घरी घेऊन येतो आणि त्यांना लहानाचं मोठं करतो. जेवहा मी 12-13 वर्षांची होती तेव्हा मला दत्तक घेण्याविषयी कळलं होतं. तेव्हा माझ्या मनात बाळाला दत्तक घेण्याचा विचार आला.'
शेफालीनं पुढे सांगितलं की 'दत्तक घेणं एक असा निर्णय आहे, ज्यात तुमचा नवरा आणि तुमचं कुटुंबाचा पाठिंबा असणं गरजेचं असतं. आमच्या घरात सगळे तयार आहेत. पण बाळ दत्तक घेण्याची प्रोसेस खूप मोठी आहे, इतक्यात मुलं मोठं होतं आणि प्रत्येक व्यक्तीला छोटं बाळ हवं असतं. मी आणि पराग बऱ्याच वर्षांपासून दत्तक घेण्याचा विचार करत आहोत, पण हे झाल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात देखील खूप फरक आहे.'
बाळाच्या प्लॅनिंगविषयी बोलताना शेफालीनं सांगितलं की 'माझ्यात आणि नवऱ्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे मला आई होण्यात अनेक अडचणी आल्या. आम्ही सगळे प्रयत्न करुन आता हे सोडून दिलं आहे. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल, जो आमच्या घरी येणार असेल, तो येईल.'
पुढे पारसनं विचारलं की 'तो येणार की ती येणार... तर शेफाली म्हणाली की ती येणार... मी आणि पारस आम्हाला दोघांना कायम एक मुलगी हवी होती. तर आता आमचं नशिब जे असेल ते पाहिलं.'
हेही वाचा : कोणी 1 कोटी तर कोणी 10 लाख.... वायनाड लॅन्डस्लाइड पीडितांसाठी दाक्षिणात्य कलाकारांनी केलं 'इतकं' दान
2008 मध्ये शेफालीनं रिअॅलिटी शो मधून सुरुवात केली. ती सगळ्यात आधी 2008 मध्ये बूगी वूगीमध्ये एक स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर शेफालीनं अनेक टिव्ही शोज केले. तर शेफालीनं 2014 मध्ये पराग त्यागीशी लग्न केलं. त्याआधी ते दोघं लिव्हइनमध्ये राहत होते. शेफाली टिव्हीवर सगळ्यात शेवटी 2019 मध्ये सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्ये दिसली होती. या शोमध्ये शेफाली स्पर्धक होती. तर त्या सीझनमध्ये तिनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते.