मुंबई : सध्या प्रत्येकजण कोरोना महामारीनंतर सर्व सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहेत. फक्त सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटात सण साजरे करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक सेलिब्रिटी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. अशात अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) मागे कशी राहिल. शर्वरीने देखील दिवाळी निमित्त कुटुंबातील खास गोष्टी सांगत शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शर्वरीने आपल्या दिवाळी सणाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. शर्वरी म्हणाली, 'दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व जण लवकर उठतो. उटणे लावून आंघोळ करतो. एवढंच नाही तर सकाळी ब्रेकफास्ट म्हणून फराळ खातो...'
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'ऐरवी प्रत्येक जण कामात व्यस्त असतो. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी कुटुंबातील प्रत्येक जण नवीन कपडे घालून मस्त तयारी करुन एकत्र येतो...' कुटुंबातील आठवणी सांगत शर्वरीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय शर्वरी वाघने (Sharvari Wagh Photo) नुकतीच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये अभिनयापेक्षा तिच्या अफेअरची चर्चा आहे.
शर्वरी वाघचं (Sharvari Wagh) नाव विकी कौशलचा (vicky Kaushal) भाऊ सनी कौशल सोबत जोडलं जात आहे. दोघे विकी कौशलच्या लग्नात देखील एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना वेग आला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची नात शर्वरी वाघ
आपल्या निखळ हास्याने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीचं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या व्यक्तीशी तितकंच महत्त्वाचं नातं आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शर्वरीचे आजोबा. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ, यांचीच शर्वरी ही कन्या. तिच्या वडिलांचं नाव, शैलेश वाघ आहे.