राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

शमिता शेट्टी आधी Raqesh Bapat सोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अभिनेत्री आता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Updated: Feb 1, 2023, 03:21 PM IST
राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा title=

Shamita Shetty On Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शमिताला नुकतंच एका पार्टीत स्पॉट करण्यात आले. यावेळी शमिता चर्चेत असण्याचं कारण एक व्हिडीओ ठरला आहे. या व्हिडीओत शमिता पार्टीतून बाहेर येत असल्याचे दिसत होते. मात्र, सगळ्यांचे लक्ष तिच्यासोबत असलेला अभिनेता आमिर अलीनं (Aamir Ali) वेधले. आमिर अलीनं तिला मिठी मारली होती. त्यामुळे राकेश बापटसोबत (Raqesh Bapat) ब्रेकअप झाल्यानंतर आता शमिता आमिर अलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता शमितानं मौन सोडलं आहे.

शमितानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत याविषयी सांगितले आहे. "हा समाज आणि त्यांची सोयीस्कर मानसिकता माझ्यासाठी अनाकलनीय आहे. कोणतंही सत्य न तपासता प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्तीबाबत का मतं बनवली जातात? नेटकऱ्यांच्या संकुचित मानसिकतेपलीकडेही बऱ्याच शक्यता असतात", अशी पोस्ट शमिताने केली आहे. 

पुढे शमितानं आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये शमिता म्हणाली, "आपल्याला मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. मी सिंगल आणि आनंदी आहे. त्यामुळे या देशातील इतर महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करुयात." 

नक्की काय होतं व्हिडीओत 

आमिरने शमिताला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर नेलं आणि तिला तिच्या गाडीपर्यंत सोडलं. आमिरला अचानक पाहून शमिता आश्चर्यचकित झाली, शमिता आणि आमिरच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक विचित्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेला शमिताचा हा व्हिडिओ आशिष चौधरीच्या वेडिंग एनिव्हर्सरी पार्टीचा आहे. वांद्रे येथील आशिषच्या घरी ही पार्टी करण्यात आली. पार्टीत शमिता व्यतिरिक्त आमिर अली, जेनिफर विंगेट आणि अनेक टीव्ही स्टार्स दिसले. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, मात्र शमिताच्या व्हिडिओने सर्वांचीच लाइमलाइट मिळवली.

शमिताचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शमिता बऱ्याच दिवसांपासून कामापासून गायब आहे. पण नुकताच तिच्या 'द टेनंट' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. हा ट्रेलर पाहून ही अभिनेत्री पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'द टेनंट' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी शमिता 'बिग बॉस'मध्ये दिसली होती, तिथून तिचे आणि राकेश बापटचं नातं सुरू झालं. मात्र काही काळानंतर दोघही वेगळे झाले