मुंबई : बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान आणि गौरी खानचा मुलगा अबराम आज आपला ५ वा वाढदिवस साजरा करतोय. यावेळी पप्पा शाहरूख आणि मम्मी गौरी खान यांनी त्याला बर्थ डे विश करत छानसा फोटो शेअर केलाय. स्टार किड्समध्ये अबराम खूप फेमस आहे. तोही आपली बहिण सुहानाप्रमाणे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी गौरीने सुहानाच्या वाढदिवसाला फोटो शेअर केला. सुहानाचे तो फोटो खूप व्हायरल झाला. गौरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अबराम गौरीच्या मांडीवर बसलेला दिसतोय. अबरामच्या फॅन्ससाठी ही मोठी बाब आहे. शाहरूख आपला मुलगा अबरामला मित्राप्रमाणे वागवतो. मीडियाकडून बऱ्याचदा त्यांना स्पॉट केलं जातं.
Happy bday, my gorgeous ... pic.twitter.com/J8ROZbwoNP
— Gauri Khan (@gaurikhan) May 26, 2018
अबरामने सर्व कॅमेऱ्यांच लक्ष आपल्याकडे खेचून घेतल्याचे अनेकदा झालंय.