मुंबई : अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नसली तरी चर्चेत असेत. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मागे टाकेल असं मीराचं सौंदर्य आहे. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे मीरा कोणत्याही ठिकाणी दिसली तरी तिच्यावर कॅमेऱ्याची नजर असते. एवढंच नाही स्वतः मीरा अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशाचं एका फोटोमुळे मीरा सध्या चर्चेत आली आहे.
मीराला या फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोल होणाऱ्या फोटोमध्ये ती पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये मीरा ग्लॅमरस दिसत आहे. पण फोटोमधील तिच्या पायांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी मीराचे पाय खोटे आहेत... अशी कमेंट केली आहे.
तर अन्य एका युझरने, 'तुझं शरीर आणि पाय सारखे दिसत नाही...' असं लिहीलं आहे. शिवाय अन्य एकाने, 'पाय फक्त खरे आहेत, बाकी मेकअरप...' अशी कमेंट केली. अशा अनेक कमेंट मीराच्या फोटोंवर आल्या आहेत. यावर मीराने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
ट्रोलर्सना उत्तर देत मीरा म्हणाली, 'सदैव माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि माझ्या पायाचं कौतुक केल्याबद्दल आभार मानायचे आहेत.. माझे पाय मला नेहमीच जमिनीवर ठेवतात.' मीराचं हे सडेतोड उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे.
मीराचा पती शाहीदच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरचं 'जर्सी' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 31 डिसेंबर रोजी सिनेमा रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहीदसोबत अभिनेत्री मृनाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.