मुंबई : बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक आणि घरगुती चित्रपटांची निर्मिती करणारा करण जोहरने हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना सुपरहीट सिनेमे दिले.
घरातूनच चित्रपट निर्मितीचा वारसा मिळालेल्या करण जोहरलाही अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. करण जोहरने एका कार्यक्रमामध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
BFF VOGUE या रिएलिटी शोमध्ये करण जोहरने त्याची खास मैत्रिण श्वेता नंदासोबत सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री नेहा धुपियाने केले होते.
सिने निर्माता करण जोहरने दिलेल्या माहितीनुसार, शाहिद कपूर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांनी त्याला रिजेक्ट केले होते. करणला शाहीद, रणवीर, अर्जुनसोबत काम करायचे होते. मात्र या तिघांनीही कामाबदाल विचारणा केल्यानंतर रिजेक्शन दिले होते.
रणवीर सिंह लवकरच रोहित शेट्टी आणि करण जोहरद्वारा बनवलेल्या 'सिंबा' चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. लवकरच करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन' निर्मित आणि मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट' चा हिंदी रिमेक 'धडक' येत्या वर्षात रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर आणि श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर ही नवी जोडी दिसणार आहे.
सैराटच्या तुफान यशानंतर 'धडक' बॉक्सऑफिसवर कशी कामगिरी करतोय ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.'धडक'चं नवं पोस्टर रसिकांंच्या भेटीला ! रीलिज डेटही जाहीर