सेम टू सेम: पाहा, लहानपणीचा शाहिद आणि त्याचा मुलगा

शाहिदचा मुलासोबतचा फोटो व्हायरल

Updated: Aug 21, 2019, 08:51 PM IST
सेम टू सेम: पाहा, लहानपणीचा शाहिद आणि त्याचा मुलगा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. शाहिदने शेअर केलेला हा फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका बाजूला शाहिदचा तर दुसऱ्या बाजूला शाहिदचा मुलगा जैनचा कोलाज केलेला फोटो दिसतोय. शाहिद आणि जैनचा हा फोटो सर्वाच्या नजरा खिळवतो आहे. हा फोटो पाहून जैन सेम टू सेम त्याचा वडिलांची झेरॉक्स कॉपी दिसतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

शाहिदने त्याच्या लहानपणीचा आणि जैनचा एक फोटो पोस्ट केला आहे. शाहिदने या फोटोला #likefatherlikeson असं कॅप्शनही दिलंय. शाहिदच्या या फोटोला अनेकांची पसंती मिळतेय. ईशान खट्टर आणि सिद्धार्थ मल्होत्रानेही या फोटोवर कमेंट केली आहे. 

 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिद २०१५ मध्ये मीरा राजपूतसह विवाहबंधनात अडकला. शाहिदला मिशा आणि जैन ही दोन मुलं आहेत. शाहिद मिशा आणि जैनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्या फोटोंनाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.

 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

शाहिद कबीर सिंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. हा चित्रपट शाहिदच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरला. शाहिदने साकारलेल्या 'कबीर' या भूमिकेने चाहत्यांनी चांगलीच पसंती मिळवली.