सेक्स रॅकेटमध्ये भारतीय अभिनेत्रींचे नाव; कपलला अमेरिकेत अटक

...

Updated: Jun 16, 2018, 02:38 PM IST
सेक्स रॅकेटमध्ये भारतीय अभिनेत्रींचे नाव; कपलला अमेरिकेत अटक title=

नवी दिल्ली: अमेरिकेत सुरू असलेल्या सेक्स रॅंकेटमध्ये भारतातील दोन तेलगू अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. शिकागो येथून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका जोडप्याला अमेरिकेच्या तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते. हे कपल तेलगू आणि कन्नड अभिनेत्रींना इव्हेंटच्या नावाखाली अमेरिकेत बोलवत असे आणि पुढे त्यांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढत असे. या तपासावेळी अभिनेत्रींची नावे पुढे आली.

तपास यंत्रणेला मिळाली धक्कादायक माहिती

प्रकरणाची चौकशी केल्यावर पुढे आले की, किशन मॉडुगुमुदी उर्फ श्रीराज चोनुपुट्टी आणि त्याची पत्नी चंद्रकला पौर्णिमा उर्फ वेभा जयम हे जोडपे सेक्स रॅकेट चालवत असे. अमेरिकेच्या फेडरल एजंट्सनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या चिठ्ठीत तेलगू अभिनेत्रींच्या देहविक्रीबाबत माहिती मिळाली. साधारण जानेवारी २०१८ मधील हा प्रकार आहे. या काळात या अभिनेत्री अमेरिकेत होत्या. दरम्यान, श्रीराज सुरूवातीचा काही काळ टॉलिवूडमध्ये प्रॉडोक्शन मॅनेजर म्हणून काम करत होता.

पैशाच्या लालसेने देहव्यापार

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्री बंगळुरू आणि चेन्नईच्या आहेत. सांगितले जात आहे की, एका व्हिडिओत दोन्ही अभिनेत्री तेलगू असोशिएशनच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होताना दिसत आहेत. एका व्हिडिओत एक अभिनेत्री श्रीराजला धन्यवाद देताना दिसते आहे. टॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा भांडाफोड करणारी अभिनेत्री श्री रेड्डीने म्हटले आहे की, तिनेही या रॅकेटला एनआरआयसोबत जोडले आहे. तिने म्हटले आह की, या अभिनेत्रींना जेव्हा काम मिळणे बंद होते तेव्हा, पैशाच्या लालसेने त्या अमेरिकेत जाऊन देहव्यापार करतात. त्यांची लोकप्रियता पाहून कोट्यवधी रूपयांची रक्कमही त्यांना मिळते असे श्री रेड्डीने म्हटले आहे.

गिऱ्हाईकाच्या शोधात कार्यक्रमांना हजेरी

तक्रारकर्त्याच्या हवाल्याने प्रसारमांध्यमांनी म्हटले आहे की, '११ मे २०१७ ते २२ जानेवारी २०१८' या काळात या जोडप्याने संबंधीत तरूणींना आपली शिकार बनवले. हे कपल पीडित तरूणींचे तिकीट बूक करत असे. त्यांना अमेरिकेलाही घेऊन जात असे. पण, अमेरिकेत पोहोचल्यावर त्यांना एखाद्या हॉटेरमध्ये घेऊन जाण्याऐजी मॉडुगुमुदीच्या घरी घेऊन जात असे. त्यानंतर या मुलींना अमेरिकेतील तेलगू तसेच इतर भारतीय संमेलनात घेऊन जात असेल. जेणेकरून जे लोक कमर्शिअल सेक्ससाठी चांगले पैसे खर्च करू शकतील अशा लांकांचा शोध घेता येईल.