'एकवेळ मेकअप शिवाय राहीन पण सेक्स शिवाय...' अभिनेत्री दिशा पटाणीचं मोठं वक्तव्य

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Updated: Sep 3, 2022, 05:19 PM IST
'एकवेळ मेकअप शिवाय राहीन पण सेक्स शिवाय...' अभिनेत्री दिशा पटाणीचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर 53 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिशा आज बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा प्रसिद्ध नसताना तिने एका एंटरटेन्मेंट पोर्टलला मुलाखत दिली होती. 

या मुलाखतीत दिशा पटनीला काही खोडकर प्रश्नही विचारण्यात आले होते. ज्याची उत्तरं तिने अतिशय मजेशीर पद्धतीने दिली होती. यावेळी दिशाला सेक्सबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता.  

मुलाखतीदरम्यान दिशा पटानीला विचारण्यात आलं की, जर तिला महिन्यातून एकदा सेक्स आणि वर्षभर मेकअप सोडण्यास सांगितलं तर ती काय सोडू शकते? यावर दिशा पटानीने बोल्ड प्रतिक्रिया दिली. या प्रश्नाचं उत्तर देताना दिशा म्हणाली, मी तसाही मेकअप जास्त करत नाही, त्यामुळे मला वाटतं की, मी मेकअप सोडेन. दिशा पटानीचं हे उत्तर खरोखरच खूप बोल्ड होतं.

यानंतर मुलाखतीत दिशाला विचारण्यात आलं की, जर तुला आयुष्यभर ओले कपडे घालण्याची सक्ती दिली गेली किंवा तुला वर्षातून एकदाच अंघोळ करण्यास सांगितलं गेलं, तर तु कोणता पर्याय निवडशील? यावर दिशा म्हणाली, मला वाटतं की, ओलं राहणं खूप जास्त होईल, म्हणून वर्षातून एकदा आंघोळ करणं ठीक आहे. मी ओले कपडे घालू शकत नाही.

 आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्रीची ही मुलाखत खूप पूर्वीची आहे. जेव्हा दिशा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध नाव नव्हतं.  मात्र, सध्या अभिनेत्री दिशा पटानीने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत तिची ही मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.