रेड कार्पेटवरुन स्टेजवर जाईपर्यंत प्रसिद्ध गायिकेसोबत जे घडलं... तातडीने घेतला मोठा निर्णय

अनेकांनी तिचे कौतुक केले तर काहींना धक्का बसला. 

Updated: Mar 1, 2022, 04:35 PM IST
 रेड कार्पेटवरुन स्टेजवर जाईपर्यंत प्रसिद्ध गायिकेसोबत जे घडलं... तातडीने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स 2022 म्हणजेच SAG अवॉर्ड सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.

प्रसिद्ध गायिका सेलिना गोमेझनेही या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. तिच्या आउटफिट आणि स्टाईलमुळे सेलिना खूप चर्चेत आली. त्याचवेळी तिने अवॉर्ड शोच्या मंचावर अनवाणी जाऊन सगळ्यांचच लक्ष वेधला.

SAG अवॉर्ड्सच्या मंचावर सेलिना गोमेझ तिचा सहकलाकार मार्टिन शॉर्टसोबत पुरस्कार देण्यासाठी पोहोचली होती. रेड कार्पेटवर तिच्या ब्लॅक आउटफिटशी जुळणारी ब्लॅक हील्स तिने परिधान केली होती, पण  सेलिना स्टेजवर अनवाणी दिसली.त्यामुळे अशा स्थितीत तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला.

अनेकांनी तिचे कौतुक केले तर काहींना धक्का बसला. यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडिया नेटकऱ्यांना प्रश्न पडला की सेलिना गोमेझ तिची हिल्स काढून स्टेजवर अनवाणी का आली?

SAG अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर सेलिना गोमेझ जबरदस्त लूकमध्ये दिसली होती. मात्र, तिच्या हिल्समुळे सेलिना फोटोग्राफर्ससमोर गुडघ्यावर पडली होती.

यानंतर, कार्यक्रमाच्या वेळीच तिने हिल्स काढण्याचा निर्णय घेतला. पण तिने अनवाणी स्टेजवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे फक्त सेलिना गोमेझच करू शकते, असेही काहींचे म्हणणे आहे.