मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी देखील तंगीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण एशियातील सर्वाधिक चार्ज करणारे कलाकार म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं.
पण यांच्याच घरी अशी वेळ आल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा आहे. रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत यांची शाळा अगदी अचानकपणे बंद झाली आहे. त्यांना शाळेचं भाडं देखील भरणं शक्य झालं नाही. त्याचप्रमाणे गेल्या काही महिनांपासून स्टाफचा पगाक देखील देणं त्यांना शक्य झालेलं नाही. याच कारणामुळे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शाळेच्या सर्व चालकांनी संप पुकारला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ६ मे पासून त्यांना पगार मिळाला नव्हता.
लता रजनीकांत यांच्या शाळेत विद्यार्थी १२ वी पर्यंत शिक्षण घेऊ शकतात. ही शाळा रेसकोर्स जवळ असून ही शाळा द आश्रम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंसचा हिस्सा आहे. ही प्रॉपर्टी भाडे तत्वावर घेण्यात आली होती. त्यामुळे आता या शाळेच्या मेनगेटवर मोठं टाळं लावण्यात आलं आहे.
या शाळेत आतापर्यंत ३०० विद्यार्थी शिकतात. ज्यांना आता तुर्तास वेलाचेरी शाळेत शिफ्ट केलं आहे. असं सांगितलं जातं आहे की, या शाळेला रिकामं करण्यासाठी मालकाने २०११ मध्ये कोर्टात केस टाकली आहे. पण आता भाडं न दिल्यामुळे शाळेच्या गेटवर टाळं ठोकण्यात आलं आहे.