अभिषेक बच्चनच्या 'The Big Bull'ची 'स्कॅम 1992'च्या अभिनेत्यासोबत होतेय तुलना, प्रतिक गांधी म्हणतोय...

स्कॅम 1992 नंतर 'बिग बुल'रिलीज झाला आणि या सिनेमातील अनेक प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांनी अभिषेक बच्चन यांच्या भूमिकेची तुलना प्रतिक गांधी यांच्याशी केली आहे. या तुलनेनंतर प्रतिक गांधीने आता आपला प्रतिसाद दिला आहे

Updated: Apr 15, 2021, 08:46 PM IST
अभिषेक बच्चनच्या 'The Big Bull'ची 'स्कॅम 1992'च्या अभिनेत्यासोबत होतेय तुलना, प्रतिक गांधी म्हणतोय... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन बिग बुलच्या निमित्ताने चर्चेत आहे. हा चित्रपट शेअर बाजारमधील दलाल हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हेमंत शाह याच्या मुख्य भूमिकेत आहे. बिग बुलच्या अगोदर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज गेल्या वर्षी स्कॅम 1992 रिलिज झाली होती. या वेब सीरिजमध्ये प्रतिक गांधी यांनी हर्षद मेहता याची भूमिका साकारली होती.

स्कॅम 1992 या सिरीजला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याचवेळी प्रतिक गांधी यांच्या अभिनयाचंही कौतुक केलं गेले. अशा परिस्थितीत स्कॅम 1992 नंतर 'बिग बुल'रिलीज झाला आणि या सिनेमातील अनेक प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांनी अभिषेक बच्चन यांच्या भूमिकेची तुलना प्रतिक गांधी यांच्याशी केली आहे. या तुलनेनंतर प्रतिक गांधीने आता आपला प्रतिसाद दिला आहे, ज्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.

तुलनेवर प्रतिक गांधी म्हणतो....
द बिग बुलच्या रिलीझनंतर प्रतिक गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. बिग बुल या सिनेमातील अभिषेकची तुलना प्रतिक गांधी बरोबर केल्यानंतर प्रतिकने यावर सांगितलं की, "मला वाटत नाही की कोणत्याही दोन लोकांची, विशेषत: जे कलाकार आहेत, त्यांची तुलना करायला नतो."माणसं वेगवेगळी असतात. ज्या प्रकारे आम्ही वेगवेगळा विचार करतो, अनुभवतो, भावना वेगळ्या असल्या पाहिजेत. यामुळे कोणत्याच तुलनेचा काहीच अर्थ नाही. दोन कलाकार वेगळे आहेत. त्यांचे स्क्रिप्ट आणि त्यातील पात्रांच्या आवश्यकता नुसार पाहिलं गेलं पाहिजे.

प्रतिक गांधी  यांनी असंही सांगितले आहे की, अभिषेक बच्चनचा 'बिग बुल' हा चित्रपट त्यांनी अजून पाहिलेला नाही, परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी तो खूप उत्साही आहे. विशेष म्हणजे 8 एप्रिल रोजी अभिषेक बच्चनचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाविषयी अभिषेकला टॅग करुन आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारून लोक या चित्रपटाचं कौतुक करीत आहेत.

या सिनेमांत अभिषेक बच्चन व्यतिरिक्त इलियाना डिक्रूज, निकिता दत्ता, सोहम शाह, सुप्रिया पाठक, महेश मांजरेकर, सौरभ शुक्ला आणि राम कपूर मुख्य भूमिकेत आहेत. बिग बुलचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती अजय देवगन आणि आनंद पंडित यांनी केली आहे. अभिषेक बच्चन यांच्या अभिनयाचे प्रेक्षक खूप कौतुक करीत आहेत.