'राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय...', वडिलांच्या निधनाला एक वर्ष होताच Sayali Sanjeev भावुक

वडिलांच्या निधनानंतर आजही स्वतःला सावरु शकली नाही सायली...  मुलगी कितीही मोठी झाली तरी... बाबांसाठी लेक कायम लहान बाळ असते... बाप आणि लेकीचं आपण कोणीच शब्दात मांडू शकत नाही. मुलीसाठी तिचा बाबा सर्व काही असतो...  

Updated: Nov 30, 2022, 03:16 PM IST
'राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय...', वडिलांच्या निधनाला एक वर्ष होताच Sayali Sanjeev भावुक title=

Sayali Sanjeev father : वडिलांसोबत मुलीचं नातं जगातील प्रत्येक नात्यापेक्षा खास असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुलीसाठी तिचा बाबा प्रेरणास्थानी असतो. मुलगी कितीही मोठी झाली तरी... बाबांसाठी लेक कायम लहान बाळ असते... बाप आणि लेकीचं आपण कोणीच शब्दात मांडू शकत नाही. मुलीसाठी तिचा बाबा सर्व काही असतो... पण तो अचानक गेल्यानंतर होणारं दुखः अतिशय वाईट असतं. अभिनेत्री सायली संजीवने (sayali sanjeev) देखील तिच्या वडिलांसाठी (Sayali Sanjeev father) भावुक पोस्ट लिहिली आहे. 

'संजीव… राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय.. खूप झालं बास.. नाही शक्य.. आजही मला हवा आहेस तू... परत ये ना... साद हि घालते लाडकी तुला.... जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा... बाबा...' बाबांचा खास फोटो शेअर करत सायलीने भावुक पोस्ट लिहिली आहे. (sayali sanjeev hot photos)

सायलीच्या बाबांचं निधन 30 नोव्हेंबर 2021 मध्ये झालं. साजलीच्या बाबांचं निधन होवून एक वर्ष उलटलं. पण अद्यापही सायली या दुखःतून सावरलेली नाही. कर्करोगामुळे त्रस्त असल्यामुळे सायलीच्या बाबांचं निधन झालं. एक वर्षानंतर सायलीने तिच्या बाबांसाठी केलेली पोस्ट प्रत्येत मुलीच्या डोळ्यात पाणी येईल. (sayali sanjeev instagram)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सायली आणि तिच्या वडिलांचं नातं बार-लेकी पेक्षा मित्र-मैत्रिणीचं अधिक होतं. सायली सोशल मीडियावर कायम वडिलांसोबत फोटो शेअर करते. बाबा गेल्यानंतर सायली एक टॅटू गोंदवला आहे, तर दुसरीकडे संजीव म्हणजे तिच्या बाबांचं नाव असलेली गोधडी शिवून घेतली. (sayali sanjeev social media)

वाचा | प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली

सायलीने 'काहे दिया परदेस' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यानंतर सायलीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सायलीचा (actress sayali sanjeev) आगामी सिनेमा 3 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.