सायली संजीव जेव्हा अशोक सराफ यांना हाक मारते तेव्हा...'ती' पोस्ट व्हायरल

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या तरूणाईच्या गळ्यात ताईत बनली आहे. आत्तापर्यंत तिनं आपल्या चाहत्यांची मनं आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीनं जिंकून घेतली आहेत.

Updated: Feb 11, 2023, 04:14 PM IST
सायली संजीव जेव्हा अशोक सराफ यांना हाक मारते तेव्हा...'ती' पोस्ट व्हायरल title=

Sayali Sanjeev Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबत एका चित्रपटातून तरी आपण काम करावे अशी प्रत्येक कलाकाराची मनोमनं इच्छा असतेच. अशोक सराफ हे अभिनयातले देव आहेत त्यामुळे त्यांचा आदर्श प्रत्येकालाचा प्रेरणा देतो. त्यांचे सगळेच प्रेमाने अशोक मामा असं म्हणतात त्यामुळे अशोक सराफ (Ashok Saraf Mama) या नावापेक्षा सगळेच त्यांना मामा म्हणूनच हाक मारतात. मागच्याच वर्षी अशोक सराफ यांचा 75 वा वाढदिवस दिमाख्यात साजरा झाला. यावेळी त्यांचे बहुरूपी हे आत्मकथनही प्रसिद्ध झाले होते सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती एका व्हायरल पोस्टची. (sayali sanjeev calls ashok papa to legendary actor ashok saraf instagram post goes viral)

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या तरूणाईच्या गळ्यात ताईत बनली आहे. आत्तापर्यंत तिनं आपल्या चाहत्यांची मनं आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीनं जिंकून घेतली आहेत. 'झिम्मा' या चित्रपटातील तिची भुमिका सगळ्यांनाच भावली आहे. सायली संजीव अभिनेते अशोक सराफ यांना वडिलांच्या समान मानते. अनेकदा सायली संजीव ही अशोक सराफ, निवेदिता सराफ यांच्यासोबत एकत्रही दिसते. नुकतीच तिनं अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती. तुम्हाला माहितीये का की सायली अशोक सराफ यांना कोणत्या नावानं हाक मारते? 

अख्खी चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांना प्रेमानं मामा म्हणून हाक मारते तेव्हा सायली संजीव ही अशोक सराफ यांना 'पप्पा' (Papa) म्हणून हाक मारते. मध्यंतरी तिनं एका मुलाखतीत सांगितले की, ती निवेदिता आणि अशोक सराफ यांना आपल्या आईवडिलांसमान मानते. तेव्हा तेही तिला आपली मानलेली मुलगी मानतात. 

सायली संजीव हिनं त्या (Sayali Sanjeev Inteview) मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या करिअरमध्ये जर का अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे नाव घेतलं नाही तर पुर्णत्वच येणार नाही. मी त्यांची मानलेली मुलगीच आहे. ते दोघंही माझी काहे दिया परदेस ही मालिका आवर्जून पाहायचे. तेव्हापासून त्यांना आम्हाला मुलगी असती तर ती अशीच असती असं वाटायचे. त्या दोघांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ते माझे सगळ्यात उत्तम समीक्षक आणि टीकाकार आहेत. मला माझ्या कामाकडे बारकाईनं लक्ष देतात आणि त्यासाठी मला नेहमीच मदत करतात. काही चुकलं मागलं असेल तर फोन करून सांगतात. अशोक पप्पा तर मला उत्तमप्रकारे मार्गदर्शन करतात. मी कसं कुठे आणि काय बोललं पाहिजे यासाठी मला कायमच मार्गदर्शन करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मी अशोक सराफ यांचे काम बघत मोठी झाली आहे. त्यांना मी कधी भेटेन असा विचारही केला नव्हता. भेटायचंच काय तर मी कधी त्यांना पप्पा म्हणेन असंही मला कधीच वाटले नव्हते. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मी त्यांनी मानलेली मुलगी आहे. असं तिनं सांगितले.