Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Updated: Mar 9, 2023, 03:09 PM IST
Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...' title=

Satish Kaushik Had Crush On Archana Puran Singh : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. सतीश यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले आहे. सतीश कौशिक हे त्यांच्या कॉमेडी भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. दरम्यान, जेव्हा सतीश कौशिक यांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली होती. तेव्हा सतीश कौशिक यांनी खुलासा केला होता की त्याची सहकलाकार अर्चना पुरण सिंग यांच्यावर त्यांचे क्रश होते. (Satish Kaushik and Archana Puran Singh)

सतीश कौशिक डायरेक्टर स्पेशल या एपिसोडमध्ये पोहोचले होते. या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे तीन दिग्गज दिग्दर्शक सतीश कौशिक, इंद्र कुमार आणि अनीस बज्मी पोहोचले होते. त्याचा एक प्रोमो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा सतीश कौशिक, इंद्र कुमार आणि अनीस बज्मी यांचे स्वागत करताना दिसला. त्यानंतर सतीश कौशिक यांना पाहून अर्चना म्हणाल्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना है.'

त्यानंतर सतीश कौशिक अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) यांना पाहत फ्लाइंग किस करताना दिसले होते. यावेळी सतीश कौशिक यांनी खुलासा केला ही, कपिल ही माझी 34 वी क्रश होती. सतीश कौशिक आणि अर्चना पुरण सिंग यांनी 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

हेही वाचा : ...आणि कारमध्ये Satish Kaushik यांनी घेतला अखेरचा श्वास; 'त्या' रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम समोर

सतीश कौशिक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट करत सतीश कौशिक यांना मिस करत असल्याचे सांगितले आहे. सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी त्यांची गाजलेली भूमिका म्हणजे कॅलेंडर. सतीश कौशिक यांनी 'मिस्टर इंडिया' (Mr. India) या चित्रपटात कॅलेंडर ही भूमिका साकारली होती.