SANJU Poster : संजय दत्तच्या सिनेमांत विक्की कौशल

संजूचा जवळचा मित्र आणि त्याची गोष्ट 

SANJU Poster : संजय दत्तच्या सिनेमांत विक्की कौशल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच 'संजू' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमातील रणबीर कपूरचं काम भरपूर चर्चेत आहे. यामुळेच प्रेक्षक या सिनेमातील कोणतेही अपडेट पाहण्यास उत्सुक असतात. नुकतेच या सिनेमाचे एक पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्तच्या अगदी जवळच्या मित्राची गोष्ट दाखवली आहे. अभिनेता विक्की कौशल या जवळच्या मित्राची भूमिका साकारत आहे. या अगोदर राजकुमार यांनी सोनम कपूर आणि परेश रावल यांचा पोस्टर शेअर केला होता. आणि आता संजय दत्तच्या जवळच्या मित्राच्या भूमिकेत विक्की दिसणार आहे. 

कोण आहे संजय दत्तचा जवळचा मित्र 

अभिनेता कुमार गौरव हा संजय दत्तच्या अगदी जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्या काळात संजय आणि कुमार गौरव एकत्र बऱ्याच ठिकाणी दिसायचे. तसेच या दोघांच्या मैत्रीचे किस्से भरपूर लोकप्रिय आहेत. संजय दत्त आणि कुमार गौरव एकमेकांना जी मिठी मारायचे किंवा ते ज्या पद्धतीने एकमेकांना किस करायचे यावरून भरपूर चर्चा रंगली होती. कुमार गौरव आणि संजय दत्त यांच्यात काहीतरी 'वेगळं' नातं असल्याची देखील चर्चा होती. 

मात्र एका मुलाखतीत याबाबत बोलताना संजय दत्तने ही गोष्ट स्पष्ट केली होती. संजय म्हणाला होता की, कुमार गौरव आणि माझ्यात नक्कीच चांगली मैत्री होती. पण आमच्यात वेगळं असं काही नातं नव्हतं. घाणेरड्या विचारांची लोकं असा विचार करतील. कारण सिनेसृष्टीत अशी मैत्री मिळणं कठीण असते. 

तसेच 80 च्या दशकात संजय दत्तचं नावं ड्रग्सची जोडलं गेलं तेव्हा कुमार गौरव याने संजय दत्तला खूप मदत केली. यावेळी नाम हा सिनेमा तयार करून संजय दत्तची प्रतिमा बदलण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसला. नाम या सिनेमाच्या 2 वर्षानंतर कुमार गौरव याने संजयच्या बहिणीशी नम्रता दत्तशी लग्न केलं. आणि या लग्नानंतर संजय आणि कुमार गौरव यांच्यात अंतर निर्माण झालं. याच कारण अद्याप कळलेल नाही. पण ही गोष्ट कुमार गौरव यांनी देखील मान्य केली होती. त्यामुळे आता ही खास मैत्री पुन्हा एकदा संजू या सिनेमानिमित्त अधोरेखित झाली आहे.