संजय कपूरच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर नंतर तिची चूलत बहिण शनायाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 

Updated: Feb 19, 2019, 06:23 PM IST
संजय कपूरच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री title=

मुंबई : कपूर कुटुंबातील आणखी एका सदस्याने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर नंतर तिची चूलत बहिण शनायाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. शनाया ही अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या आहे. पण शनायाने अभिनयात डेब्यू केला नसून डायरेक्शनमध्ये डेब्यू केला आहे. सध्या शनाया लखनौमध्ये तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. कपूर कुटुंबात सोनम आणि जान्हवी कपूर या दोहींनीच अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. वडील संजय कपूर आणि आई माहीप कपूर यांनी त्यांच्या मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.  

माहीप कपूरने सोशल मीडियवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'माझी बेबी दोन आठवड्यांसाठी लखनौमध्ये आहे, मला तुझी खूप आठवन येत आहे' असे लिहले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My baby’s gone to Lucknow for 2 weeksMissYouAlready #AssistantDirectorsLife #LoveYou shanayakapoor02 #ProudMama 

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor) on

 

गेल्या वर्षी झालेल्या मुलाखतीत संजय कपूरला शनायाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्याने शनायाला अभिनय क्षेत्रात करियर करणार असल्याचे सांगितले होते. शनायाच्या आधी सोनम कपूर आणि अर्जून कपूरने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून आपल्या करियरची सुरूवात केली होती.