बर्थ डे स्पेशल: जेव्हा संजय दत्तला जेलमध्ये झालं प्रेम

संजय दत्त जेलमध्ये असतांना पडला होता प्रेमात 

Updated: Jul 29, 2018, 01:30 PM IST
बर्थ डे स्पेशल: जेव्हा संजय दत्तला जेलमध्ये झालं प्रेम title=

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त आज 59 वर्षाचा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जीवनावर आधारीत 'संजू' सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत 330 कोटी रुपये कमवले आहेत. या सिनेमावर अनेकांनी टीका देखील केली आहे.  संजू सिनेमामध्ये संजय दत्तला एक चांगला व्यक्ती म्हणून दाखवण्यात आल्याची टीका करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का संजय दत्त जेलमध्ये असतांना तो प्रेमात पडला होता.

संजय दत्त जेलमध्ये असतांना त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लईच्या प्रेमात पडला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने रिया सोबत लग्न देखील केलं पण दोघेही खूप काळ एकत्र नाही राहू शकले. मुंबई बॉम ब्लास्ट प्रकरणात जेव्हा संजय दत्त जेलमध्ये गेला तेव्हा रिया त्याच्या पाठिशी उभी होती. ती नेहमी त्याला भेटण्यासाठी जेलमध्ये जात होती. ही तीच वेळ होती जेव्हा संजय दत्त रियाच्या प्रेमात पडत होता. ही गोष्ट स्वत: एकदा संजय दत्तने मान्य केली होती.