'संजू'मधील एआर रेहमानचे पहिले गाणे रिलीज

संजय दत्तचा बायोपिक संजू सिनेमातील तिसरे गाणे रुबी रुबी रिलीज झाले आहे. 

Updated: Jun 20, 2018, 04:39 PM IST

 

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक संजू सिनेमातील तिसरे गाणे रुबी रुबी रिलीज झाले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजू हिरानी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन या गाण्याची ऑडिओ लिंक शेअर केली आहे. या गाण्याला एआर रेहमानने संगीतबद्ध केलंय. तर हे गाणं इरशाद कामिल यांनी लिहिलयं. 

हे गाणं शाश्वत सिंह आणि पूर्वी यांनी गायलंय. सिनेमातील दोन गाणी याआधीच रिलीज झालीत. पहिले गाणे 'मैं बढ़‍िया, तू भी बढ़‍िया' मध्ये संजय दत्तची भूमिका निभावणाऱ्या रणबीरसोबत सोनम कपूर दिसली आहे. तर दुसऱ्या गाण्यात कर हर मैदान फतेहमध्ये संजय दत्त ड्रग्सच्या नशेत कसा केला आणि त्यादरम्यानचा काळ दाखवण्यात आलाय. 

संजू हा सिनेमा २९ जून २०१८मध्ये रिलीज होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूरसह मनीषा कोईराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर आधीच रिलीज झालाय.