दिल्लीत 'सांड की आंख' टॅक्स फ्री

उत्तर प्रदेश मधील गावातल्या वृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

Updated: Oct 26, 2019, 11:13 AM IST
दिल्लीत 'सांड की आंख' टॅक्स फ्री title=

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर 'सांड की आंख' चित्रपट शुक्रवारी रूपेरी पडद्यावर दाखल झाला. उत्तर प्रदेश मधील गावातल्या वृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने 'सांड की आंख' चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. 'सांड की आंख चित्रपट सर्व गटातील महिलांसाठी प्रेरणा देणारा चित्रपट आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. 

चित्रपटाला मिळत असलेल्या यशाबद्दल हिरानंदानी सांगतात की, 'खुप चांगला अनुभव आहे. हा अनुभव मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. चित्रपटावर गर्व आहे त्याचप्रमाणे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील फार चांगल्या आहेत. शिवाय बॉलिवूडकरांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे.' अशा प्रकारे त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आंख' चित्रपटामध्ये तापसी आणि भूमी शिवाय प्रकाश झा, विनीत कुमार सिंह आणि पवन चोप्रा देखील मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. 

चंद्रो तोमर यांची भूमिका साकारलेल्या तापसीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, तर भूमीने चित्रपटात प्रकाशी तोमर यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिले आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.