'कुछ कुछ होता है' मधील सना सईद दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून चाहत्यांनी विचारलं ही तीच अंजली आहे का?

कुछ कुछ होता है या चित्रपटात निरागस दिसणारी सना सईदचा फोटो व्हायरल

Updated: Dec 12, 2021, 10:08 PM IST
 'कुछ कुछ होता है' मधील सना सईद दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून चाहत्यांनी विचारलं ही तीच अंजली आहे का? title=

मुंबई : तुम्हा सर्वांना करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' चित्रपट आठवत असेल. 1998 मध्ये आलेल्या या चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले होते. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यात लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता.   या चित्रपटातील तिन्ही स्टार्सचं काम लोकांना प्रचंड आवडलं, पण सर्वाधिक लोकप्रियता चित्रपटात राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सना सईदने मिळवली.

या चित्रपटात छोट्या अंजलीच्या भूमिकेने सगळ्यांची मनं जिंकणारी सना सईद आता मोठी झाली आहे. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी तिचा एक लेटेस्ट फोटो घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

कुछ कुछ होता है या चित्रपटात निरागस दिसणारी सना सईद आता मोठी झाली आहे. सना सईद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सना सईद आता ३३ वर्षांची झाली आहे, पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही हे खेदजनक आहे. काही चित्रपटांव्यतिरिक्त, ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसला होती, परंतु असं असूनही तिला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या सना सईदच्या ताज्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या शॉर्ट टॉप आणि पॅन्टमध्ये दिसतेय. या फोटोमध्ये. ती तीच छोटी अंजली आहे हे तिला पाहून बहुतेकांना ओळखता येत नाही. सना सईदचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.