Actress Sana Khan Birthday: अभिनेत्री सना खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाचेही अनेक जण फॅन्स आहेत. सोबतच इन्टाग्रानवरही तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. आपल्या पोस्टनं ती चाहत्यांना कायमच अपडेट ठेवत असते. त्यातून तिच्या अभिनयाला फॉलो करणारेही अनेक तिचे चाहते आहेत. परंतु तिचे आयुष्य हे अनेक वादांनी घरलेले आहे. आज तिचा वाढदिवस आहे. तिचा जन्म मुंबई येथे झाला होता. तिनं अनेक टेलिव्हिजन आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. तिच्या अनेक भुमिकाही या गाजल्या आहेत. 'जय हो' या सलमान खानच्या चित्रपटातही तिनं महत्त्वपुर्ण भुमिका केली होती. त्याचसोबत ती बिग बॉस या रिएलिटी शोमध्येही दिसली होती. त्यामुळे तिची सोशल मीडियवावरून अनेकदा चर्चा होताना दिसते. या लेखातून जाणून घेऊया तिच्या काही Controversies बद्दल.
सना खान दुबईला गेली होती तेव्हा तिनं बुर्ज खलिफाला भेट दिली होती. तिथल्या एटमॉस्फियर रेस्तरांमधील हा फोटो व्हायरल झाला होता. जेथे बसून ती सोन्याचा वर्ख असलेला चहा पित होती. हा सोन्याचा वर्ख 24 कॅरेटचा होता. तिचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या चहाची किंमत भारतीय चलनानुसार, 3,300 रूपये आहे.
मध्यंतरी आपल्या धर्मासाठी तिनं अभिनय सोडला असल्याची चर्चा सुरू झाली होती. तिची एक पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झाली होती. ज्यानं तिनं याविषयी खुलासाल केला होता. त्यामुळे तिची सोशल मीडियावर तेव्हा चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळाली होती. एवढंच नव्हे तर तिला फार विविध प्रश्नही विचारायला सुरूवात केली होती. आता मला कुठल्याही कामासाठी बोलवू नये, दिलेल्या सहकार्याबद्दल आभार अशी तिची पोस्ट होती.
5 जूलै रोजी तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिच्या प्रेग्नंन्सीबद्दल तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तिनं आपल्या प्रेग्नंन्सीच्या संघर्षाबद्दलही बोलताना दिसत होती. ती इन्टाग्रामवरून आपल्याला मुलगा झाल्याची बातमी शेअर केली होती. तिला गरोदर असताना चालताना, उठताना, बसतानाही फार त्रास होत होता, याबद्दल तिनं सांगितले होते. 2020 तिनं लग्न केले. तिचे ब्रेकअपही झाले होते. ज्यामुळे ती नैराश्यातही गेली होती. सध्या ती आपलं आईपण एन्जॉय करताना दिसते आहे. सध्या ती मनोरंजनक्षेत्रापासून लांब आहे.