Samantha Ruth Prabhu कडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ?

चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून एकमेकांपासून वेगळं होण्याच्या निर्णयानंतर समंथाकडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ?   

Updated: May 10, 2022, 03:44 PM IST
Samantha Ruth Prabhu कडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ?  title=

मुंबई : समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी घटस्फोटमागचं कारण अतिशय खाजगी ठेवलं आहे, त्यानंतर या एक्स कपलच्या नात्याबद्दल विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. सध्या समंथा 'द फॅमिली मॅन 2' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. सिनेमासाठी समंथाने फोटोशूट केलं आहे. फोटोंमध्ये समंथा प्रचंड सुंदर दिसत आहे. पण अनेकांचं लक्ष समंथाचा पूर्वपती 'नागा चैतन्य'च्या सिग्नेचर टॅटूवर होता. 

समंथाना उजव्या हातावर टॅटू काढला होता. पण आता तिच्या हातावर टॅटू दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. फोटो पाहून तिने मोठ्या हुशारीने टॅटू लवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. 

तो क्या वाकई सामंथा रुथ प्रभु ने हटवा दिया टैटू?

नागा चैतन्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेली सामंथाने तिच्या एक्स पतीला समर्पित करून तिच्या बॉडीवर एक नाही तर तीन टॅटू बनवले होते. सामंथाच्या उजव्या बरगडीवर 'चाय' लिहिलं होतं. तिच्या मानेच्या मागच्या बाजूला, तिने तिच्या 'ये माया चेसावे' या पदार्पणाच्या सिनेमाचा टॅटू काढला आहे.

ज्यात ती नागा चैतन्यसोबत रोमान्स करताना दिसली होती. समंथा आणि नागाच्या नात्याची सुरुवात 2010 साली आलेल्या याच रोमँटिक ड्रामा सिनेमापासून झाली होती. अभिनेत्रीचा तिसरा टॅटू तिच्या उजव्या हातावर बनवला आहे. हे समंथाने नागासाठी कोरलेले टॅटू आहेत. जे तिने तिच्या पतीसाठी बनवले होते.