घटस्फोटानंतर सामंथाकडून महिन्याभरात Good News! चाहते म्हणाले 'All The Best'

अभिनेत्री आणि नागा यांनी 2017 मध्ये 7 ऑक्टोबर रोजी लग्न केलं.

Updated: Oct 17, 2021, 06:10 PM IST
घटस्फोटानंतर सामंथाकडून महिन्याभरात Good News! चाहते म्हणाले 'All The Best' title=

मुंबई : अभिनेत्री सामंथा गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याचवेळी, आता सामंथाने चाहत्यांसोबत एक चांगली बातमी शेअर केली आहे, जे जाणून तिचे चाहते थोडे आनंदी दिसत आहेत. ही बातमी सामंथाच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित आहे. खरं तर सामंथा रूथ प्रभू लवकरच तिच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

प्रोडक्शन हाऊस ड्रीम वॉरियर पिक्चर्सने आपल्या आगामी प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा आयकॉनिक चित्रपट ड्रीम वॉरियर पिक्चर्सची ही 30वी फिल्म आहे आणि या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सामंथाचे चाहते आनंदी झाली आहे, ज्यामुळे त्यांनी अभिनेत्रीला चित्रपटासाठी All The Best म्हटलं आहे.

सामंथा घटस्फोटानंतर खचली होती, परंतु या सगळ्यातुन बाहेत येत तिने नवीन आणि एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. ज्यामुळे तिचे चाहते खूश झाले आहेत आणि तिला मोठ्या परद्यावरती पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सामंथाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री आणि नागा यांनी 2017 मध्ये 7 ऑक्टोबर रोजी लग्न केले. त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पाडले ज्याची जगभरात चर्चा झाली. नागार्जुन हे दक्षिणेतील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे, म्हणून त्यांनी आपल्या सुनेचे स्वागत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

ऐवढेच काय तर त्यांच्या लग्नात अनेक कोटींचा खर्च देखील झाला. या दोघांनीही दोन पद्धतीने लग्न केले. एक साऊथ इंडियन म्हणजेच हिंदू पद्धतीने आणि दुसरे त्यांनी कॅथलीक पद्धतीने लग्नं केलं. सामंथा आणि नागा चैतन्याच्या लग्नाचे बजेट सुमारे 10 कोटी रुपये होते.

या लग्नात, त्याच्या सजावटीपासून समंथा आणि नागाच्या जोडप्यापर्यंत आणि दागिन्यांपर्यंत, पोटगीची रक्कम सर्वेत्र चर्चेचा विषय बनली. परंतु या पोटगीची ही रक्कम लग्नाच्या संपूर्ण बजेटपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

अहवालांनुसार, असे सांगितले जात आहे की, नागार्जुनचे कुटुंब घटस्फोटासाठी सामंथाला 200 कोटी रुपयांची भरपाई देण्यास तयार झाले होते. परंतु सामंथाने ते नाकारले.

रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने ही रक्कम घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने हा खुलासा केला आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, 'समंथा सध्या खूपच खचली आहे. तिला या लग्नातून फक्त प्रेम आणि समर्थन हवे होते. जे तिला मिळाले नाही आणि आता हे लग्न संपलं आहे. त्यामुळे तिला कुटुंबाकडून एक पैसाही नको आहे.'