समंथा - नागाच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीची पोस्ट वेधतेय चाहतत्यांच लक्ष

 घटस्फोटानंतर साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे.

Updated: Oct 20, 2021, 04:43 PM IST
समंथा - नागाच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीची पोस्ट वेधतेय चाहतत्यांच लक्ष title=

मुंबई : घटस्फोटानंतर साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे. ज्यात समंथा तिच्या मैत्रिणीसोबत टग ऑफ वॉर खेळताना दिसत आहे. समंथाच्या आधी हा व्हिडिओ तिची मैत्रीण फॅशन-डिझायनर आणि मॉडेल शिल्पा रेड्डीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात दोघंही धमाल मस्ती करताना दिसत आहेत.

सामंथाने शेअर केला फनी व्हिडिओ
त्याचबरोबर शिल्पानंतर आता सामंथानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, एक सुंदर, वेडा, मजेदार, आरामदायी आठवडा जो माझ्या मैत्रिणीसोबत एका क्षणात गेला .. #myclan #mytribe. पूर्ण तंदुरुस्त, वेड्या स्पर्धात्मक कुटुंबासोबत कधीही खेळात भाग घेऊ नका. तुम्हाला दुखापत होईल तुम्हाला वेदना होतील. #canstilllaugh #willsurvive, तर शिल्पा रेड्डीने व्हिडीओ व्यतिरिक्त समंथासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा-नागाचं नातं तुटलं
समंथा आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झालं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला घटस्फोटाची घोषणा केली. यासाठी, सामंथाने सोशल मीडियावर लिहिलं की, "आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, खूप विचारविनिमयानंतर, आम्ही वेगळे झालो आहोत.