Samantha च्या गाण्यामुळे मोठा वाद, भक्ति गीतला आयटम साँग बनवल्याचा दावा

 बंदी घालण्याची मागणी केली आणि गुन्हाही दाखल केला.

Updated: Jan 15, 2022, 07:27 PM IST
 Samantha च्या गाण्यामुळे मोठा वाद, भक्ति गीतला आयटम साँग बनवल्याचा दावा  title=

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट नुकताच दक्षिण आणि हिंदी भाषांमध्ये देखील OTT वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा भक्कम असून, त्याची गाणीही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. एकीकडे अल्लूने बोललेले डायलॉग्स बनवून अनेक लोक व्हिडिओ बनवत आहेत, तर दुसरीकडे समंथाच्या आयटम साँगवर आणि रश्मिकाच्या 'सामी-सामी' गाण्यावर अनेक मुलींवर  रिल्स तयार करून शेअर करत आहेत. 

पण गेल्या काही दिवसांपासून समंथाचे गाणं वादात फसल्याची चर्चा होत आहे. या चित्रपटातील 'ऊ अंतवा' हे गाणेवादात सापडले, त्याविरोधात एका पुरुष गटाने त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आणि गुन्हाही दाखल केला.

अलीकडेच, पुष्पाचे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटातील 'ऊ अंतवा', 'श्रीवल्ली' आणि 'सामी सामी' या हिट गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे. दरम्यान, 'ऊ अंतवा' या गाण्यावरून झालेल्या वादावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 एका राजकीय पक्षाच्या सदस्याने 'ऊ अंतवा' गाण्यावर आक्षेप घेत असा दावा केला होता की, भक्ती गीताचे आयटम नंबरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

गाण्यावरून वाद निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षाला उत्तर देताना देवी श्री प्रसाद म्हणाले, "असे नव्हते.. साधारणपणे मी एका पत्रकार बैठकीत आयटम साँगबद्दल बोलत होतो, तेव्हा कोणीतरी मला विचारले की तू त्या आयटमवर का काम करत आहेस? ज्यावर मी उत्तर दिले की ते एक आयटम साँग आहे, जे माझ्यासाठी फक्त एक गाणे आहे आणि ते आम्हाला पूर्ण करायचे आहे.

प्रेमगीत असेल किंवा आयटम साँग असेल. दुसरीकडे, हे भक्तीगीत असेल तर.. माझ्यासाठी हे गाणे आहे, यासाठी मला सर्वकाही करावे लागेल. माझ्यासाठी भक्ती असो, प्रेम असो किंवा आयटम साँग असो, कम्पोझिंगची प्रक्रिया तशीच राहते.