नागा चैतन्यचं आलिशान घर आज Samantha च्या नावावर?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने साऊथ सेन्सेशन समंथा रुथ प्रभू चर्चेत आहे. 

Updated: Jan 20, 2022, 01:45 PM IST
 नागा चैतन्यचं आलिशान घर आज Samantha च्या नावावर? title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने साऊथ सेन्सेशन समंथा रुथ प्रभू चर्चेत आहे. मागील संपूर्ण वर्ष समंथासाठी रोलर कोस्टर राईडसारखे होते, जिथे तिला खूप चढ-उतार पाहायला मिळाले. 

गेल्या वर्षी अभिनेत्रीने तिचा पती नागा चैतन्य अक्किनेनीसोबत घटस्फोट घेतला. मात्र, आता समंथा ज्या आलिशान घरामध्ये राहते त्या घराबद्दल एकच चर्चा होत आहे. कारण तिचे हे घर फारच लग्झरी असलेले आहे.

समंथा तिच्या पतीसोबत हैदराबादमध्ये एका पॉश लोकेशनवर राहत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे घर नागा चैतन्यचे होते, मात्र, समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी हे घर अभिनेत्रीला दिले आणि स्वतः दुसऱ्या घरात शिफ्ट झाले. त्यामुळे नागा चैतन्यचं आलिशान घर आज समंथाच्या नावावर असल्याचं ही बोललं जातं.

घराच्या मागील बाजूस एक अद्भुत मोठं अंगण आहे, जेथे समंथाला योगा करायला आवडते.समंथाच्या घरात एक अतिशय आलिशान स्विमिंग पूलही आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर येथील फोटो शेअर करत असते.

अभिनेत्रीच्या घरात एक गार्डन आहे जिथे ती भाज्या पिकवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथाला बागकाम आणि सेंद्रिय शेतीची आवड आहे.घरात एक स्वतंत्र जेवणाची जागा देखील आहे जेथील वास्तुकला अतिशय प्रेक्षणीय आहे. 

चित्रांमध्ये तुम्ही सामंथाची बेडरूम देखील पाहू शकता जो खूप प्रशस्त आहे.समंथा सध्या तिच्या पुष्पा चित्रपटातील आयटम साँगमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथाने या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 5 कोटी रुपये चार्ज केले आहेत.