मुंबई : साऊथ सिनेमातील अभिनेत्री सामंथा रथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहे. असं असताना सामंथा प्रभू स्वतःचा असा वेळ घालवत आहेत. अभिनेत्री आता देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशमध्ये आपला वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर सामंथाने आपले फोटो पोस्ट केले आहेत.
सामंताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ऋषिकेश ट्रिपची अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या रिसॉर्टमधून उंच हिरव्या पर्वतांचे दृश्य खूप सुंदर दिसते. हे फोटो बघून असे म्हणता येईल की, घटस्फोटानंतर अभिनेत्री आपले मन शांत करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी येथे आली आहे.
या प्रवासादरम्यान, सामंथा श्री स्वामी पुरुषोत्तम नंद जी महाराज वशिष्ठ आश्रमातही पोहोचली. येथे तिने आश्रमाचे काही फोटो बोर्ड सोशल मीडियावरही शेअर केला. "ज्या आनंदाच्या शोधात आहोत ते आपल्यामध्येच आहे" असे फलक लिहिले होते.
अलीकडेच, घटस्फोटानंतर, सामंथाला पाठिंबा दिल्यामुळे तिने चाहत्यांचे आभार मानले. ते म्हणाले की तुमच्या भावनिक पाठिंब्याने तिला भारावून टाकले आहे. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये एकमेकांशी लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर म्हणजेच 2 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामाबद्दल बोलायचं झालं तर, सामंथा ऍमेझॉन प्राइमवरील 'द फॅमिली मॅन -2' मध्ये दिसली. या सिरीजमधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तसेच आता सामंथा तेलगु सिनेमा शांकुतलम आणि तमिळ सिनेमा काथु वकुला रेंदू काधलमध्ये व्यस्त आहे.