'या' अभिनेत्री आहेत मल्टीटॅलेंटेड, अभिनयासह बिझनेसमध्येही 'सुपरहिट'

'या' सहा अभिनेत्री अभिनयासह जिम, रेस्टॉरंट चालवून करोडो कमवतात, कोण आहेत या अभिनेत्री

Updated: Aug 23, 2022, 02:30 PM IST
'या' अभिनेत्री आहेत मल्टीटॅलेंटेड, अभिनयासह बिझनेसमध्येही 'सुपरहिट' title=

मुंबई : मोठ्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयासह इतर क्षेत्रातही आपला हातआजमावत आहेत. काही अभिनेत्रींनी स्वत:च ब्रॅंड काढलं, काहींनी रेस्टॉरंट तर काहींनी जिम उघडली. अशाप्रकारे या अभिनेत्री अभिनयासह 
बिझनेसमध्येही सुपरहीट आहेत. या बिझनेसच्या माध्यमातून त्या करोडो कमाई करत आहे. या अभिनेत्री कोण आहेत ते जाणून घेऊयात.  

लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नयनतारा एक प्रसिद्घ अभिनेत्री आहे. या नयनताराचे 'राऊडी पिक्चर्स' नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. यासोबतच ही अभिनेत्री एका रेस्टॉरंट आणि कॉस्मेटिक कंपनीची मालकीण आहे. दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.

समांथा रुथ प्रभु एक प्रसिद्घ अभिनेत्री आहे. चित्रपटासह ती वेबसीरीजमध्येही काम करते. चित्रपटासह सामंथाची गुंतवणूक प्रोफाइल बरीच मोठी आहे. ती साकी नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवते आणि तिने अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूकही केली आहे.

तापसी पन्नू  ही अभिनेत्री ही 'दोबारा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही आहे. चित्रपटासह तापसी पन्नू तिची बहीण आणि मैत्रिणीसोबत 'द वेडिंग फॅक्टरी' ही वेडिंग प्लानिंग कंपनी चालवते.


श्रिया सरन ही दिग्गज अभिनेत्री आहे. दृष्यममधील तिची व्यक्तीरेखा अनेकांना आवडली होती. या अभिनेत्रीचे मुंबईत स्वतःचे वेलनेस सेंटर आणि स्पा आहे. काही अपंग लोक हे चालवतात. 

रकुल प्रीत सिंह एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासह रकुल प्रीत तिच्या फिटनेससाठी खास ओळखली जाते.  रकुल प्रीतची 'F-45 फिटनेस हेल्थ क्लब' नावाची स्वतःची जिम देखील आहे

काजल अग्रवाल देखील एक फेमस अभिनेत्री आहे. अभिनयासह काजल अग्रवालने तिच्या बहिणीसोबत 'मर्सला' नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. चित्रपटांप्रमाणेच ती व्यवसायातही यशस्वी ठरली आहे.