मुंबई : सामंथा-नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनतर सर्वत्र अभिनेत्री आणि अभिनेत्याबद्दल चर्चा होत आहेत. ते घटस्फोटानंतर काय करत आहेत, कोणासोबत आयुष्य घालवत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सूक आहेत. सामंथा सोशल मीडियावरती खूप ऍक्टीव्ह असते आणि ती जे काही करते ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सामंथाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन घटस्फोटानंतर आपल्या पती सोबतच्या सगळ्या आठवणी डीलीट केल्या असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या त्यात आता तिने एक पोस्ट करत आपल्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीबद्दल खुलासा केला आहे.
सामंथाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे आणि ती व्यक्ती तिच्यासाठी किती खास आणि महत्वाची आहे, याबद्दल देखील तिने सांगितले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये सामंथाने तिच्या मित्रांसोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो खरेतर तिना आपल्या डॉक्टर मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केला आहे. सामंथाच्या या जवळील व्यक्तीचे नाव Dr Manjula Anagani आहे.
सामंथाने फोटो शेअर करत लिहीले की, "Dr Manjula Anagani मी स्वत:ला खूप लकी समजते की, माझ्याकडे तुझ्यासारखी मैत्रीण आहे. ते म्हणतात की, नेहमी तुमच्या कठीण काळात खरा मित्र समोर येतो आणि डॉक्टरपेक्षा खरा मित्र कोणीही नाही... मला आशा आहे की आज तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला माहीत पडलं असेल. happy birthday !"
या फोटोमुळे सामांथाच्या आयुष्यात कोणती व्यक्ची सध्या जवळची आणि महत्वाची आहे, हे चाहत्यांच्या समोर आले आहे. सामंथाने फोटो शेअर केल्यानंतर तिला चाहते आणि तिच्या जवळच्या व्यक्तीकडून भरभरुन लाईक्स मिळाले आहेत.